श्री दत्तगडावर लाखो भाविकांची मांदियाळी

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

श्री श्री १००८ प.पू.महंत श्री मधुसूदनजी भारती महाराज यांच्या हस्ते दत्त जन्म सोहळा मोठ्या धार्मिक वातावरणात संपन्न!

माहूर तालुका प्रतिनिधी विजयसिंह हजारी

माहूर – लाखो भाविकांच्या मांदियाळीत “देवा दत्ता दत्ता,देवा दत्ता दत्ता” नामस्मरणाच्या प्रचंड गजरात देवभूमी माहूरगड आज अक्षरश: दुमदुमून गेल्याने सर्वत्र भक्तिसागर अगदी ओसंडून वाहत असल्याचे अलौकिक दृश्य आज माहूरगड येथे पाहावयास मिळाले.सह्याद्री पर्वतरांगेतील श्री दत्त शिखर संस्थान माहूरगड येथे १९ ते २८ डिसेंबर या पुण्य कालावधी दरम्यान यावर्षीचा श्री दत्त जयंती उत्सव सुरू असून,

आज मार्गशीर्ष शु.१४ सोमवार दि.२५ रोजी दुपारी २:०० वाजता श्री श्री १००८ प.पू.महंत श्री मधुसूदनजी भारती महाराज गुरू अच्च्युतजी भारती महाराज यांच्या पावन हस्ते धार्मिक परंपरेनुसार मोठ्या भक्तिमय वातावरणात असंख्य भाविकांच्या उपस्थितीत विधिवत

पार पडला.

 

सर्वप्रथम श्री दत्त शिखर संस्थानचे श्री श्री १००८ प.पू.महंत श्री मधुसूदनजी भारती महाराज गुरू अच्च्युतजी भारती महाराज यांच्या हस्ते प्रभु श्री दत्त महाराजाला अभिषेक करण्यात आला.यावेळी मुख्य पूजारी श्री वासुदेव भारती महाराज,श्री चिरंजीव भारती महाराज,श्री हरिहर भारती महाराज,श्री चिंतामण भारती महाराज या सर्व महापुरुषांची प्रामुख्याने उपस्थिती होती.तदनंतर मंदिर परिसरातील सर्व महंतांच्या समाधी स्थळांचे पूजन करण्यात आले.त्यानंतर दत्त जन्माच्या मुख्य सोहळ्यासाठी महंत महाराजांचे सभा मंडपामध्ये आगमन झाले.सभामंडपामध्ये सर्वप्रथम पोथीचे पूजन,महंत महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात येऊन त्यानंतर दत्त जन्माच्या पोथीला सुरुवात झाली.या सर्व धार्मिक विधीचे पौरोहित्य वंशपरंपरागत ब्राह्मण पूजारी श्री ॠषीकेश जोशी,श्री विलासराव जोशी,श्री रवींद्र जोशी व श्री विकास जोशी यांनी केले. त्यानंतर प्रसिद्ध कीर्तनकार श्री देवकते आणि संच यांच्या धार्मिक कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

दरम्यान कार्यालयीन व्यवस्थापक उज्वल भोपी व देशपांडे यांनी संपूर्ण दत्त जयंती जन्मोत्सवादरम्यान भाविकांच्या दर्शनासाठी शिखर संस्थान च्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मदतीने नियोजनबद्ध व्यवस्था केल्याने लाखो भाविकांना सुरळीतपणे दत्त दर्शनाचा लाभ घेता येत असून,आजच्या चौथ्या पालखीसह दत्त जन्म सोहळ्यासाठी चोखपणे यात्रा नियोजन व्यवस्थापक भोपी कर्मचारी देशपांडे यांनी सांभाळले आहे.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!