भोकर प्रतिनिधी गोविंद चिखलवाड.
भोकर – वरून उमरी कडे जात असलेल्या चार चाकी वाहनाचा समोरील टायर फुटल्याने चालकाचा गतिवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात पाच जण जागी ठार झाले. वाहन हळदा मोघाळी गावाच्या दरम्यान हळद्यच्या फुलावरून खाली पडल्याने हा भीषण अपघात झाला. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून इतर पाच जण गंभीर जखमी आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णांना नांदेड येथे हलवण्यात आले आहे.
भोकर येथील नातेवाईकांच्या घरील कार्यक्रमातून आटोपून दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास तेलंगणाकडे चार चाकी वाहनाने जात असताना वाहनाचे समोरील टायर फुटल्याने वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि हळदा फुलावरून वाहन खाली कोसळले. वाहनातील काही जणांनी आरडाओरड केल्याने जवळच्या शेतात असलेले शेतकरी मदतीसाठी धावून आले. या अपघाताची माहिती भोकर पोलीस स्टेशन येथे कळल्यानंतर भोकर येथील पोलीस निरीक्षक श्री सुभाषचंद्र मारकड, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप जाधव, सा.पो.उपनिरीक्षक संभाजी देवकांबळे, जमदार रवी मुधोळ, पो.ना. परमेश्वर कळणे, पो. कॉ. लहू राठोड,पो. चालक मंगेश शिरसागर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
वाहनात अडकलेल्याना बाहेर काढले असता त्यातील सविता शाम भालेराव(२५) प्रीती परमेश्वर भालेराव (८) रा. रेनापुर ता. भोकर जि. नांदेड सुशील मारुती गायकवाड(९) रा .रामखडक ता. उमरी यांचा जागीच मृत्यू झाल्याचे निदर्शनात आले. तर गंभीर जखमी असलेल्या रेखाबाई परमेश्वर भालेराव(३०), अंजनबाई ज्ञानेश्वर भालेराव(२८), श्याम तुकाराम भालेराव (३५) तिघेही रा.रेनापुर यांना पुढील अधिक उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले असता नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी उपरोक्त दोघींचा रस्त्यातच मृत्यू तेथील डॉक्टरांनी घोषित केले.
जखमी झालेल्या वर भोकर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर रेड्डी व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रथमोपचार केले. गंभीर जखमी शाम तुकाराम भालेराव यांच्यावर शासकीय रुग्णालय नांदेड येथे उपचार सुरू आहे. तसेच इतर जखमी दत्ता ज्ञानेश्वर भालेराव, सोहम ज्ञानेश्वर भालेराव, ज्ञानेश्वर तुकाराम भालेराव, प्रितेश परमेश्वर भालेराव रा.रेणापूर ता. भोकर यांच्यावर भोकर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. सदरील घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.