ऋषभ पंतने झळकावले अनोखे शतकही पूर्ण केले. ; दिल्ली कॅपिटल्ससाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नवी दिल्ली – आयपीएल २०२४ चा नववा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना झाला. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यासह ऋषभ पंत आयपीएलमध्ये १०० सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. विशेष म्हणजे दिल्ली कॅपिटल्सकडून १०० सामने खेळणारा तो पहिला खेळाडू आहे. याआधी या फ्रँचायझीसाठी कोणताही खेळाडू आयपीएलमध्ये १०० सामने खेळू शकलेला नाही. यावेळी दिल्ली कॅपिटल्स संघाकडून ऋषभ पंत १०० क्रमांकाची जर्सी भेट देण्यात आली.

 

Share This Article
error: Content is protected !!