नायगाव प्रतिनिधी /अशोक वाघमारे )
नायगाव – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत मिलेनियम पब्लिक स्कूलचे विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेत मिलेनियम पब्लिक स्कूल या शाळेचा इयत्ता पाचवीतील विद्यार्थी रुद्र नकाते. अबोली चव्हाण. सर्वेश सोमवार. विराट पवार. समृद्धी भोसले. सत्कार गायकवाड. व आठवीतील विद्यार्थी सृष्टी कल्याण.वैष्णवी उत्कर. प्रथमेश घोडके. इत्यादींनी घवघवीत यश संपादन केले. त्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर. प्रशासकीय प्रमुख के.व्ही. फाजगे. प्राचार्य संदीप वडजे. ज्ञानेश्वर जोशी सर. यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुक करून अभिनंदन केले.