डॉ.राजाराम कोळेकर यांची दंत शल्यचिकित्सक गट ब पदी नियुक्ती

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नांदेड : महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत राज्यातील जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथील दंत शल्यचिकित्सक या पदा करीता सन २०१५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या कडून नियुक्ती बाबत पात्र उमेदवार यांची नियुक्ती प्रक्रिया राबवून दंत शल्य चिकित्सक यांची निवड यादी मागविण्यात आली होती काही न्यायालयीन प्रक्रिया मुळे पात्र दंत शल्यचिकित्सक यांची निवड यादी प्रसिद्ध करण्यासाठी विलंब झाला होता. दि.१८ सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या संकेतस्थळावर दंत शल्यचिकित्सक ५१ पात्र उमेदवार यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली.

ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आयपीएचएस अंतर्गत कार्यरत असलेले डॉ राजाराम कोळेकर यांची या निवड यादी निवड करण्यात आली.
आज त्यांच्या निवडी बदल आरोग्य सहाय्यक सत्यजीत टिप्रेसवार, व्यंकटेश पुलकंठवार, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बालाजी चांडोळकर यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

तसेच त्यांच्या या निवडी बदल जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड डॉ. निळकंठ भोसीकर,भोकर ग्रामीण रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधिक्षक डॉ. अशोक मुंडे,प्र.वैद्यकीय अधिक्षक डॉ.अनंत चव्हाण, ग्रामीण रुग्णालय भोकर येथील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, हत्तीरोग नियंत्रण उपपथक भोकर, किनी येथील आरोग्य सहाय्यक,आरोग्य कर्मचारी व क्षेत्र कर्मचारी
यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या.

Share This Article
error: Content is protected !!