माजी जिल्हा पोलीस अध्यक्ष डॉ.रवींद्र कुमार सिंगल यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न.

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

शिबिरात १०० पेक्षा अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:येथील माजी पोलीस अधीक्षक तथा सध्याचे अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रम नांदेड शहरातील श्री स्वामी समर्थ ब्लड डोनर ग्रुप व पोलीस मित्रपरिवार यांच्यावतीने पोलीस मुख्यालय नांदेड च्या पाठीमागील गणपती मंदिरासमोर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला..

डॉ.सिंघल नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असताना सन 2007 व 2008 मधील पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शकता करून एक आदर्श निर्माण केला होता.

त्याचीच जाणीव ठेवून त्याबरोबरच त्यांचे आरोग्य विषयक जागरूकता पोलीस दलातील इतरांना प्रेरित करणारी आहे सामाजिक बांधिलकीची जाणीव व डॉ.सिंगल साहेब यांना वाढदिवसाची भेट म्हणून सदरील कार्यक्रमाच्या माध्यमातून मागील 3 वर्षापासून रक्तदान शिबिर व सामाजिक कार्यक्रम श्री स्वामी समर्थ ब्लड डोनर ग्रुप व पोलीस मित्र परिवाराच्या वतीने घेण्यात येत आहेत.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सन 2007 बॅचचे सर्व अंमलदार व श्री.प्रवीण आम्लकंठवार,श्री. दत्ता गायकवाड,श्री.संतोष सोनसळे,श्री.प्रकाश मामुलवार, श्री.अमोल टाक,श्री.रणजीत नरवाडे या अंमलदारानी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

त्यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 100 पेक्षा अधिक रक्तदान त्यांनी रक्तदान केले त्याबरोबरच पानबोशी येथे माळरानावर 151 वडाच्या झाडाची वृक्षारोपण करून त्याच्या संगोपनाचेही नियोजन पोलीस मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले याशिवाय हॅपी बर्थडे पुस्तक वाटप विद्यार्थ्यांना लागणारे साहित्य वाटप असे विविध उपक्रम यावेळी राबविण्यात आले अशी माहिती पोलीस मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे.

Share This Article
error: Content is protected !!