भोकर ता.प्रतिनिधी/
भोकर – संघर्ष युवा प्रतिष्ठान व राहुल पाटील कोंडलवार मित्र परिवारातर्फे आयोजित दहीहंडी महोत्सव भोकर येथील मोंढा मैदानात उत्साहात साजरा करण्यात आला.

गोकुळाष्टमीच्या औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवसेनेचे राहुल पाटील कोंडलवार यांनी संघर्ष युवा प्रतिष्ठान व मित्र मंडळाच्या वतीने 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक आठ वाजता येथील मोंढा मैदानात यांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त दहीहंडी फोडनाऱ्या गोविंदा पथकास रोख पारितोषिक 25,551 रुपये बक्षीस ठेवण्यात आले होते. या महोत्सवाला परिसरातील अनेक गोविंदा पथक आले होते. या महोत्सवाला भोकर परिसरातील सर्व नागरिकांनी हजेरी लावली होती. .या महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख बबनराव बारसे हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते द्वीप प्रजलित करून दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.या महोत्सवाला डीजेच्या तालावर तरुण वर्ग आनंद लुटत होते. शिवसेना जिल्हा समन्वयक अड. परमेश्वर पांचाळ, मुदखेड शहर प्रमुख सचिन चंद्रे ,भोकर शिवसेना शहर प्रमुख पांडुरंग वर्षवार ,अर्धापूर शहर प्रमुख काझी सल्ला उद्दीन, सुभाष नाईक, संतोष आलेवाड, साहेबराव भोंबे ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष पाटील किंनीकर युवा सेनेचे कृष्णा पाटील कोंडलवार, माधव करेवाड ,विशाल बुद्धेवाड, पिंटू सानप, संतोष पाटील कदम, किनी सर्कल प्रमुख रमेश महागावकर, प्रदीप दौलतदार, पांडुरंग कटकमवाड, सुनील जाधव, सूर्यकांत पिंगलवाड, श्याम वाघमारे ,उत्तम कसबे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवाला यशस्वीरित्या आयोजक संघर्ष युवा प्रतिष्ठान व राहुल पाटील कोंडलवारसह मित्रमंडळींनी परिश्रम घेतला आहे.