177800रुपयांचा मुदेमाल व जुगाराचे साहित्य जप्त
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
नांदेड :दि.22.जिल्यातील धर्माबाद तहसिल कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत तीरट नावाचा जुगार पैसे लाऊन खेळत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांना मिळाली लगेच त्यांनी उपरोक्त ठिकाणी कार्यवाहीसाठी पथक पाठवून चालू आसलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत सुमारे 177800 रुपयांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य जप्त केले असून 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील अवैध धंदे व जुगाराचे अड्डे बंद करण्यासाठी पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून सातत्याने प्रत्येक ठिकाणी धाडी टाकून गुन्हे दाखल केले जात आहे.
धर्माबाद तहसिल कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या शिवारात तिरट नावाचा जुगार पैसे लाऊन खेळत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांना कळताच त्यांनी उपरोक्त ठिकाणी कार्यवाहीसाठी पथक पाठवून धाड टाकली त्या ठिकाणी एकूण 22 हजार 800 रुपये नगदी,चार मोटार सायकल व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले व जुगार खेळणारे व खेळविणारे अशा एकूण 7 जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही सहायक पोलिस निरीक्षक बालाजी महाजन , सहायक पोलिस निरीक्षक रमेश जाधवर,उमेश कारामुंगे,संतोष अनेराव,सुपारे,इंजपवाड यांच्या पथकाने ही कार्यवाही केली आहे.