हिमायतनगर ता.प्रतिनिधी जरगेवाड बाबाराव
हिमायतनगर – सिरंजनी येथील नवयुवक सार्वजनिक बाल गणेश मंडळा तर्फे सध्या चालू असलेल्या लंपिस्कीन आजारांवर पशूंना लसीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती.
नवयुवक सार्वजनिक बाल गणेश मंडळा कडूण सालाबाद प्रमाने याहीवर्षी अनेक कार्यक्रम आयोजित केले आहे.सिरंजनी येथील गणेश मंडळा पैकी सार्वजनिक बाल गणेश मंडळ हे ऊत्साही बाल गणेश म्हणून ओळखले जाते.या मंडळानी आयोजित केलेल्या लसीकरणात अनेक शेतकऱ्यांच्या पशूंना लसीकरण करण्यात आले आहे.
या लशीकरणासाठी हिमायतनगर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉ चंचल जाधव, डॉ सत्यजीत कोठेकर, डॉ शिंदे यांची उपस्थिती लाभली होती.तर यांच्या प्रमुख उपस्थितीत जनावरांना चारा बियाणे वाटप करण्यात आले आहे.
मंडळा तर्फे डॉ टिमचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे.झालेला कार्यक्रम पार पाडण्यासाठी मंडळातील बजरंग कात्रे,बाळु सूर्यवंशी, प्रमोद सुंकरवाड सह अनेक सदस्यानी हिरेरीने सहभागी होऊन कार्यक्रम पार पाडला आहे.
यांच मंडळा तर्फे दि.25रोजी सर्वात श्रेष्ठ दान समजणारे रक्त दान ठेवले आहे.या रक्त दानात जास्त संख्येने दात्यांनी सहभागी होऊन रक्त दान करावे असे आवाहन मंडळा तर्फे करण्यात आले आहे.