महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या राज्य उपाध्यक्षपदी प्रफुल्ल सावंत यांची निवड

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड : महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाची विस्तारीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यामध्ये नांदेड येथील अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेश कार्यकारिणी सरचिटणीस प्रफुल्ल सावंत यांच्या कार्याची दखल घेऊन प्रफुल्ल सावंत यांची कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचा विस्तार करुन काही पदांमध्ये फेरबदल करण्यात आला असून याबाबतची घोषणा नवी दिल्ली येथे अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोटीया यांनी केली.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व नांदेडचे माजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण,माजी मंत्री डी.पी.सावंत,नांदेड महानगराध्यक्ष तथा प्रदेश उपाध्यक्ष आ.अमरभाऊ राजूरकर,महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हतीअंबीरे यांच्या शिफारशीवरुन प्रफुल्ल सावंत यांची कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


या निवडीबद्दल माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आ. मोहनराव हंबर्डे, आ. जितेश अंतापूरकर,आ.माधवराव जवळगावकर,माजी आमदार अमिताताई चव्हाण,जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी महापौर जयश्रीताई पावडे, जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस व कृउबास सभापती संजय देशमुख लहानकर, कॉंग्रेसचे प्रदेश सचिव ऍड. सुरेंद्र घोडजकर, प्रदेश महिला कॉंग्रेसच्या जि. प.च्या माजी सभापती अनिताताई इंगोले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, प्रदेश सचिव डॉ. श्रावण रॅपनवाड, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष व वसमतचे माजी नगरसेवक राजकुमार एंगडे, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा.मनोहर पवार, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ.गंगाधर सोनकांबळे,अनु.जा.जिल्हा सरचिटणीस संजीवकुमार गायकवाड,युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पु पाटील कौंढेकर, युवक कॉंग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ.विठ्ठल पावडे,नांदेड तालुका कॉंग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष ऍड.निलेश पावडे,श्यामभाऊ दरक,माजी उपमहापौर अब्दुल गफार,स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी,माजी सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, माजी महापौर बलवंतसिंघ गाडीवाले,नांदेड तालुकाध्यक्ष सेवादल राजकमल सिंघ गाडीवाले,कामाजी अटकोरे,किशनराव रावणगावकर,उमाकांत पवार,सुभाष काटकांबळे,माजी शहर अध्यक्ष अनु.जा.अनिल कांबळे यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Share This Article
error: Content is protected !!