बासर तीर्थक्षेत्रावर मनेरवारलू समाजातर्फे उभारल्या जाणाऱ्या भव्य धर्म शाळेला धर्माबाद तालुका मनेरवारलू संघटनेतर्फे एक लाख 21 हजारांची मदत

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यातील धर्माबाद शहरा पासून अवघ्या 14 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या व भारतात एकमेव असणाऱ्या माता सरस्वती मंदिर तीर्थक्षेत्रावर मनेरवारलू समाजातर्फे एक भव्य दिव्य अशी धर्मशाळा उभारल्या जाणार असून ती फक्त मनेरवारलू समाजाच्या लोकसभागातूनच असणार आहे.

लोकसहभागाच्या पार्श्वभूमीवर तेलंगाना आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील सर्व समाज बांधव ठिकठिकाणी मीटिंग घेत आहेत. आज धर्माबाद शहरातील गंगा सिटी मधील सुदर्शन मंगल कार्यालयात मनेरवारलू समाज संघटनेची उपरोक्त पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.या बैठकीस तेलंगाना राज्यातील आदिलाबाद जिल्ह्याचे रौला रमेश व धर्मशाळा निर्मिती समितीचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

तद्वतच धर्माबाद येथील मनेरवारलू समाजाचे उभरते नेतृत्व डी.आर.अण्णा कंदकुर्तीकर,औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य डी.डी. ऐनलोड,विठ्ठलराव कोंडलवाडे, लक्ष्मणराव कोंडलवाडे, श्रीनिवास आंदेलवार, समराळ्याचे माजी सरपंच नरसैया ऐनलोड,भोजराम पाटील करखेलीकर,मोहन मुंडे, यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्ती व समाज बांधव उपस्थित होते.

बासर तीर्थक्षेत्रावर उभारल्या जाणारी मनेरवारलू समाज भक्तांसाठी धर्मशाळा ही भव्य दिव्य असणार असून त्या धर्मशाळेत अत्याधुनिक सोयी सुविधा मिळणार आहेत.

भक्तांना राहण्यासाठी निवास व नियमित भोजन हे या धर्मशाळेचे खास वैशिष्ट्य असणार असून त्यासाठी बासरतीर्थक्षेत्रावर जागाही घेण्यात आली आहे. फक्त मनेरवारलू समाजाच्या लोकसभागातून उपरोक्त धर्मशाळा निर्माण व्हावी यासाठी धर्मशाळां निर्मिती समितीचे सर्व सदस्यांनी आणि खास करून डी आर अण्णा कंदकुर्तीकर यांनी उपरोक्त बैठकीत समाज बांधवांना आवाहन केले. त्या आव्हानाला प्रतिसाद देत धर्माबाद तालुका मनेरवारलू संघटनेतर्फे तब्बल एक लाख एकवीस हजार रुपये उपरोध धर्म शाळेत जो नित्य अन्न सत्र चालणार आहे.

त्यासाठी देण्याचे ठरले असून लोक सहभागातून जास्तीची रक्कम झाली तरी ती देण्यात येईल असे प्रामाणिकपणे जाहीर करण्यात आले आहे. उपरोक्त बैठकीस धर्माबाद तालुक्यातील जवळपास 39 गावातून समाजाचे प्रतिष्ठित नागरिक आले होते.

Share This Article
error: Content is protected !!