नांदेड तालुकाध्यक्ष पदी एकनाथ बत्तलवाड यांची निवड
नांदेड : रविवार रोजी हॉटेल विसावा पॅलेस नांदेड येथे गुरुवर्य द.भ.प. श्री साईनाथ महाराज बितनाळकर वसमतकर यांचे मार्गदर्शनाखाली व प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड भोसीकर यांचे अध्यक्षतेखाली गोल्ला गोलेवार यादव महासंघाची बैठक संपन्न झाली. सर्व प्रथम गुरुवर्य साईनाथ महाराज यांनी वाघा बॉर्डर व सीमाभागात दीड हजार भक्त गणा सोबत सात दिवस व्यसन मुक्ती व स्वच्छता अभियान राबवून राष्ट्रीय सेवा केल्याबद्दल व अधिक मासात माहूर तालुका चुलबंद ठेवून अन्नदान केल्याबद्दल समाजाच्या वतीने सत्कार करून गौरव करण्यात आला.
या बैठकीस संबोधित करताना गुरूवर्य द.भ. प. श्री साईनाथ महाराज म्हणाले की, समाज कार्य करत असताना असत्याला न घाबरता, सत्याच्या बाजूने ठामपणे लढले पाहिजे. कसलाही स्वार्थ न बाळगता निस्वार्थ भावनेने समाज कार्य करणाऱ्याच्या पाठीमागे सदैव ईश्वर व ईश्वर रुपी पाठबळ असते. त्याच प्रकारे सत्याच्या मार्गाने सेवा करा, सेवा करतांना कसल्याही प्रकारची चूक होवू देता कामा नये. अचूक सेवा करणाऱ्याच्या मी खंभिर पाठीशी आहे. असे अनमोल मार्गदर्शन गुरुवर्य साईनाथ महाराजांनी केले.
व तसेच या बैठकीत आगामी कार्यक्रमाचे नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. व 23 ऑक्टोबर रोजी माहूर येथे दसरा मेलाव्यानिमित व्यसन दहन व इतर कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रदेश अध्यक्ष श्री भुमन्ना आक्केमवाड भोसीकर व जिल्हाध्यक्ष श्री रमेश बद्दिवार यांनी केले. या बैठकीत गोल्ला गोलेवार यादव महासंघाच्या नांदेड तालुका अध्यक्ष पदी श्री एकनाथ बत्तलवाड ब्राम्हणवाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी प्रमुख उपस्थितीत प्रदेश कोषाध्यक्ष श्री प्रभाकर फांजेवाड, नांदेड जिल्हाध्यक्ष इंजि. रमेश बद्दिवार, मुदखेड प. स. चे उपसभापती श्री आनंदराव गादीलवाड, जेष्ठ मार्गदर्शक श्री पिराजी बुटेपवाड चिंचाळकर, जिल्हा सचिव श्री अशोकराव कासराळीकर, ज्येष्ठ पत्रकार श्री मनोज कमठे, जिल्हा कोषाध्यक्ष श्री तुकाराम कैलवाड, कर्मचारी प्रांत अध्यक्ष श्री अनुप अन्नमवार, जिल्हा मर्मचारी अध्यक्ष श्री मा.ना. झंपलवार, अर्धापूर ता. अध्यक्ष श्री गंगाधर बकेवाड, श्री नारायणराव वटपलवाड, भोकर ता. अधक्ष श्री संतोष आक्केमवाड, मार्गदर्शक श्री बालाजीराव सेनेवाड, मुदखेड ता. अध्यक्ष श्री राम गवंडेवाड, जि. कार्याध्यक्ष श्री बापूराव बाचेवाड चिखलीकर, संघटक श्री कैलास आक्कमवाड, जि. समन्वयक श्री विनोद जानापुरे, सरचिटणीस श्री गोविंदराव भुसलवाड, श्री बी.के. पाटील कोटेकल्लुरकर, श्री सुरेशराव पासेमवाड, श्री विठ्ठलराव जकीलवाड, श्री गणेशराव क्यातमवाड, श्री प्रल्हादराव बाचेवाड, श्री सुरेशराव जांगीलवाड, श्री दत्ता जांगीलवाड, युवा संघटक श्री योगेश मंत्रे, श्री तुकाराम बल्फेवाड ब इतर समाज बांधव उपस्थित होते.