पशूधन पर्यवेक्षक चंचल जाधव भव्य सत्कार!

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

हिमायतनगर ता. जरगेवाड बाबाराव
हिमायतनगर – मौजे सिरंजनी येथे गणपती बाप्पा चे आगमन झाले आसून गावातील गणेश मंडळा तर्फे आनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.याच प्रकारे सार्वजनिक नवयुवक बाल गणेश मंडळा तर्फे सध्या सर्वत्र चालू असलेल्या लंपिस्कीन आजारांवर उपाय योजना म्हणून सिरंजनी गावातील पशूंना लसीकरण करण्यात आले आहे.या लशीकरणात अनेक शेतकऱ्यांच्या पशूंना लशी देण्यात आले आसून सिरंजनी नगरीत महिला पशू धन पर्वक्षक म्हणून चंचल जाधव यांची उपस्थिती लाभली होती,गावात प्रथमच महीला पशूधन पर्यवेक्षक यांची उपस्थिती लाभली असल्याने पशूधन पर्यवेक्षक चंचल जाधव यांचा नवयूवक सार्वजनिक बाल गणेश मंडळा तर्फे शाल श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी चंचल जाधव यांनी आनेक शेतकऱ्यांना लंपिस्कीन आजारांवर योग्य मार्गदर्शन केले आहे ‌.व प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पशूंना लसीकरण करण्याची सूचना केली आहे.

Share This Article
error: Content is protected !!