नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड :दि.29.जिल्यातील खाजगीकरण -कंत्राटीकरण विरोधी कृती समिती नांदेड च्या वतीने राज्यातील सरकारी नोकर भरती खासगी कंपन्यांमार्फत करण्याचा राज्य सरकार जो निर्णय घेतला आहे,तो निर्णय तत्काळ रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी खासगीकरण व कंत्राटीकरण विरोधी कृती समितीच्यावतीने ६ ऑक्टोबरला निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या आहे.त्यांच्या हाताला रोजगार नाही,सरकारी नोकरीचे खासगीकरण केल्यास सर्वसामान्यांच्या मुलांनी
शिक्षण घेऊन जायचे कुठे,असा प्रश्न निर्माण झाला आहे.
खासगी कंपनीमार्फत होणारी नोकर भरती तत्काळ रद्द करावी व इतर मागण्या घेऊन राज्य शासनाच्या धोरणाविरोधात खासगीकरण व कंत्राटीकरण विरोधी कृती समिती शहरातील महात्मा ज्योतिबा फुले पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निषेध मोर्चा काढणार आहे.
या मोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कृती समितीकडून करण्यात आले आहे.शासकीय विश्रामगृह येथील बैठकीत हा निर्णय झाला.