मुदखेड तालुक्यातील मौजे चिलपिंपरी येथे गणरायचे शांततेत विसर्जन

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

मुदखेड प्रतिनिधी/ राहुल कोलते

मुदखेड – दिनांक २९ सप्टें मुदखेड तालुक्यातील मौजे चिलपिंपरी येथे सार्वजनिक गणेश मंडळ चिलपिंपरी यांचे अकरा दिवस वेगवेगळ्या उपक्रम राबवत ११ दिवस कधी निघून गेले कळालेच नाही अखेर शेवटच्या दिवशी गणपती बाप्पा यांची भव्य मिरवणूक काढून गावातील प्रमुख रस्त्यानी ढोल ताश्याच्या गजरामध्ये वाजत गाजत नाचत ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणा देत. गणरायांची मिरवणूक काढण्यात आली. प्रशासनाला सहकार्य करत ‘एक गाव एक गणपती ‘ ही संकल्पना गेल्या अनेक वर्षापासून चिलपिंप्री मध्ये पार पडत आहेत.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणरायाचे विसर्जन अगदी शांततेमध्ये मौजे चिलपिंपरी येथे पार पडले.सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष तसेच गावातील प्रमुख व्यक्ती, नवयुवक तरुण मंडळी, गावातील प्रमुख राजकीय नेते,तसेच गावचे पोलीस पाटील, पत्रकार या सर्वांनी मिरवणुकीत सहभागी होते.

Share This Article
error: Content is protected !!