उमरी तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने आरक्षण एस.टी. प्रवर्गातून मिळवण्याकरिता चक्काजाम आंदोलन करण्यात आले

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

 

नांदेड विशेष प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नांदेड- – उमरी तालुक्यातील सकल धनगर समाज बांधवांनी एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळविण्याकरिता व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमीत श्री संतोष बडगर यांनी गेल्या 19 दिवसापासून धनगर समाजाला आरक्षण मिळण्याकरिता आमरण उपोषणाला बसले आहेत. 19 दिवस उपोषण ला बसले असता सरकारने मात्र धनगर आरक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून त्या अनुषंगाने राज्यातील धनगर समाजाच्या भावना तीव्र झालेल्या दिसून येत आहेत. म्हणून संतोष बडगर यांच्या समर्थ नार्थ दिनांक 3 /10/2023 रोजी उमरी शहरा लगत असलेले अहिल्यादेवी होळकर चौक येथे उमरी तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन व रस्ता रोको करण्यात आले होते.
सदरील धनगर समाजाच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत सकल धनगर समाजाच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये आंदोलने उपोषणे करण्यात येतील. आणि राज्य शासनाच्या वतीने जाणीवपूर्वक धनगर समाजाच्या आरक्षणात दुर्लक्ष होत असून उमरी तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने राज्य सरकारचा जाहीर निषेध देखील करण्यात आला आहे. राज्यातील गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या सरकारने आरक्षणाचे खोटे आश्वासन देऊन समाजाचा केवळ मतासाठी वापर केला जात आहे. समाजाचा कुठल्याच प्रकारचा विकास झाला नसून देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाले असून अजूनही समाज मेंढपाळा करून जीवनाचे परवा न करता कुठल्याही शेतात व झाडी झुडपे जीवन जगत आहे. राज्यातील धनगर समाज आरक्षणापासून मोठा वंचित आहे. समाजाचा शैक्षणिक व आर्थिक विकास झाला नसून समाज राज्यामध्ये लाखोंच्या संख्येमध्ये असून देखील समाजाचा राज्यातील सत्ताधारी लोकांनी केवळ आणि केवळ मतांचा वापर होईपर्यंत जवळ करतो आणि निवडणूक संपल्या की समाजा कडे दुर्लक्ष करतो. अशी आमच्या समाजाबद्दलची सरकारची हीन वृत्ती यापुढे आम्ही खपवून घेणार नाही. असेही धनगर समाजातील कार्यकर्ते यांची भावना दिसून येत आहे.
सदर मागण्या घेऊन धनगर समाजाने यापुढे राज्यभरात असेच आंदोलने मोर्चे काढणार असल्याच इशारा देखील देण्यात आला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबरोबरच मेंढ्या साठी चारोळ्या करिता प्रत्येक जिल्ह्यामध्ये जमिनी उपलब्ध करून देण्यात याव. राज्यातील धनगर समाजाला दहा लाखापर्यंत चे कर्ज देण्यात यावे. अहमदनगर येथे झालेल्या धनगर समाजातील व्यक्तीवर महसूल मंत्री विखे पाटील यांच्यासमोर झालेल्या मारहाणीत म्हणून विखे पाटील यांचा राजीनामा तात्काळ घेण्यात यावा. अशा विविध मागण्याकरिता उमरी तालुक्यातील सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. सदर मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही राजकीय नेत्याला आमच्या समाजाकडे फिरू देत नाही. आणि जोपर्यंत आमचं आरक्षण मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही वेगळे निर्णय घेऊ असा आहे सणाटीत इशारा सरकारला देण्यात आला आहे. सदर मागण्याचे पत्र तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनला देऊन संपूर्ण धनगर समाजाच्या मागणी करिता धनगर समाज कटीबद्ध असल्याचे दिसून आले आहे.

Share This Article
error: Content is protected !!