फेस्कॉन,मराठवाडा प्रादेशिक विभाग ऊ नांदेड यांचे संयुकत विद्यमाने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना निमित्य कार्यशाळा “कर्तूव्यांचे देणे” हा कार्यक्रम संपन्न

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

 

जिल्हा विधी सेवा प्रधिकरन व महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – येथील नियोजन भवन येथे “ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त” बचत भवन नांदेड येथे ज्येष्ठ नागरिकांची कार्यशाळेत सुरुवातीस
महात्मा फुले,शाहू महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पुष्प आर्पण दिपप्रज्यलीत करूनजिल्हा परिषद CEO मा.श्रीमती मीनल करनवाल यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.जज सौ.दलजितकौर मा.अशोक तेरकर,प्रमुख अतिथी मा.श्रीमती मीनलजी करनवाल मुख्यकार्यकारी अधिकारी तथा प्रशासक,जिल्हा परिषद नांदेड, मा.डॉ.महेश कुमार डोईफोडे आयुक्त,नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड,जंयवत सोमावाड सचिव मराठवाडा प्रदेशीक विभाग उत्तर नांदेड या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा.डॉ नंदकुमार मुलमुले,मा.निवृत्ती वडगावकर,
राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंचाचे मा.विजय देशमुख,मा.शिवानंद मीनगीरे साययक आयुक्त समाजकल्याण नांदेड,बापू दासरी समाज कल्याण अधिकारी नांदेड या सर्वाचे पुष्प गुच्छ शाल देउन सत्कार करण्यात आले आहे.शिवानंद मीनगीरे प्रस्तावना करीत असते वेळी ग्रामीण भागामध्ये वरचेवर ज्येष्ठ नागरिकांचे समस्या वाढत आहेत.

आपल्या पाल्याने आई,वडिलांचे व्यवस्थीत पालनपोषण करित नसल्याचे ग्रामीण भागात जास्तीजास्त
प्रकरण आढळून येत आहेत.

मोठ्या हुद्यावर नौकरी करित असतांना कुटुंबाचे सदस्य वाढले की मुलाच्या समोर घरच्या बाहेर कडीत असते वेळी मुलाने विचारले की बाबा तुम्ही आजोबांना घरच्या बाहेर का काडता तुम्हाला पण मी मोठा झाल्यावर घरच्या बाहेर काडिन असे म्हटल्यावर संस्कार पेरले तसे उगवणार असे मनोगतात व्यक्त केले. महानगरपालिकेचे आयुक्त आपले विचार व्यक्त करते वेळी आपल्या च कुटुंबातील संस्कृती बद्दल आदर्श संस्कार आम्हाला आमच्या वडिलांचे आहेत.आजही वडील आटोडयातून तिन चार शेताला जाऊन येत असतात.मलापण एक भाऊ आहे.भावापेक्षा वडीलाचा चेहरा तेजस्वी दिसतो.आपले दिनचर्या सकाळ पाच वाजल्या पासून सुरू होते.

माझे व माझ्या भावाचे कुओ व्यवस्थीत असल्याने जास्त काही सागत नाहीत तेवढेच सबंध आहेत.असे मनोगतात विचार डोईफोडे सरानी व्यक्त केली आहेत.गायकवाड यांनी ज्येष्ठ नागरिक यांच्या कायदा विषयी आपले मनोगत व्यक्त करतेवेळी २००७ मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.आपल्या मुलांनी आई वडीलांचे पालनपोषण करित नसल्यास तक्रार कोणाकडे करण्यात यावी.कोणी म्हणते पोलीस स्टेशन मध्ये करावी, एसपी कार्यालयात करावी, जिल्हाधिकारी यांच्याकडे करावी यामध्ये गोंधळून जाता आपण साद चार ओळीच अर्ज तशिलदार यांच्या कडे केले तरी भरपूर झाले त्याची कारवाई ताबडतोब केली जाते.त्याच्या खर्चा साठी कमीतकमी दहा हजार रुपये मंतली द्यावी लागते असे कमी वेळात योग्य शब्दात आपले मनोगत व्यक्त केले आहे.मा.विजय देशमुख मनोगत व्यक्त करीत असताना आपल्या देशाचा जिडपी 290 दोनशे नव्वद कोटी आहे. ज्येष्ठ नागरिकाचे११टक्के आहे.

त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी मंतली १०,००० मागणी केली आहे. प्रत्येक विभागासाठी मंत्रालय आहे.आमच्यासाठी मंत्रालय पाहिजे,प्रत्येक देशामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र दवाखाना आहेत या मागणीसाठी जोरदारपणे सभाग्रहातून प्रतिसाद नागरीक देत होते.अशा प्रकारे विचार व्यक्त केले आहेत.

मा.बापू दासरी सरानी आपले विचार कविता व गझल मधून व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.बापू दासरी सरानी सुंदर केले आहे की ज्येष्ठ नागरिकांना बोर मनन्याची वेळ आली नाही.या कार्यक्रमाचे अभार प्रदर्शन मा.डॉ निर्मला कोरे यांनी सर्वाचे अभार मानले.

Share This Article
error: Content is protected !!