नांदेड जिल्हा प्रतिनीधी/
नवीन नांदेड: 52 महाराष्ट्र एनसीसी बटालियन नांदेड यांच्या वतीने राष्ट्र छात्रसैनिकां करिता वार्षिक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात हिंगोली, परभणी व नांदेड विविध जिल्ह्यातील 465 एनसीसी चे विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झालेले आहेत.
या शिबिराचे उद्घाटन 52 महाराष्ट्र एनसीसी बटालियन चे कमांडिंग अधिकारी कर्नल एम रंगाराव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी एनसीसी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. हा कॅम्प 26 जुन 2023 ते 05 जुलै 2023 या कालावधीत दहा दिवसाचा हा प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे. या शिबिरात छात्र सैनिकांना ड्रील, शस्त्र कवायत, फायरिंग, नकाशा अध्ययन , अंबुश, पेट्रोल, ट्राफिक कंट्रोल, यासोबत आपातकालीन , आत्मरक्षा, नागरी सुरक्षा, या विविध विषयासह भारतीय सैन्यांचा इतिहास याविषयीचे सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिरार्थी यांना सैन्य प्रशिक्षण हेतू फायरिंग सराव व स्पर्धा , ड्रिल स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा ,फायरिंग ,टेन्ट पिचिंग, क्रॉस कंट्री यासह विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांकरिता भौतिक सुविधा यांची व्यवस्था एन सी सी निदेशालय व बटालियन च्या वतीने करण्यात आलेली आहे. माता साहब गुरुद्वारा नांदेड यांचे महंत यांच्या संयुक्त प्रयत्नाने प्रशिक्षणार्थींना भव्य प्रांगणात प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे भाग्य लाभले आहे ,असे मनोगत याप्रसंगी कमान अधिकारी कर्नल यम रंगराव यांनी व्यक्त केले.
वार्षिक शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कर्नल एम रंगाराव यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी देशसेवेचे व्रत अंगीकारून सैन्यदलात सहभागी व्हावे. राष्ट्रीय छात्र सेना जननी व जन्मभूमि हे सर्वोत्तम संस्कार देणारे व्यासपीठ आहे. सुसंस्कार भारतीय विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचे कार्य वार्षिक प्रशिक्षण शिबिरात केले. छात्र सेनेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी भारतीय सैन्यात, पोलीस राज्य राखीव दलात, केंद्रीय राखीव दलात चांगली भूमिका बजावीत आहेत तसेच एनसीसी उपक्रमात प्रशिक्षण घेतल्यानंतर विविध क्षेत्रात कार्यरत आहे सैनिकों ने स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी कठिन परिश्रम करावे असे मनोगत व्यक्त केले.
या शिबिराचे प्रशिक्षण शिस्तबद्ध व वेळेनुसार करण्यासाठी 52 महाराष्ट्र बटालियन चे कमांडिंग एम रंगाराव , यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी लेफ्टनंट डॉ.सराफ प्रशांत,लेफ्टनंट डॉ.नीरज उपलंचवार, फस्ट ऑफिसर सोवडतकर अनिल, सेकंड ऑफिसर शेट्टे देवीदास,सुभेदार मेजर रमेश सिंह, सुभेदार गणेश दत्त, सुबेदार गणेश सिंह,सुभेदार वैजनाथ चौगुले,नायब सुभेदार रामन शर्मा ,नायब सुबेदार राकेश कुमार,बी एच एम हवलदर गुरुसिद्दप्पा, सुरेश सिंह ,येशविर सिंह,योगेश कुमार, जितेंद्र पाल ,जसबिर कुमार, रमेश,नरेंद्र कुमार, कटरे,अरविंद कुमार, संजय घोष ,कार्यालयीन लिपिक शेख अन्सारी,जे के काटकर आदी परिश्रम घेत आहेत.