लोहगाव येथील काही गुंड प्रवर्तिच्या व्यक्तीकडू कुंभारगाव व हुस्सा येथील दोन मुलांना बेदम मारहाण करून रस्त्याच्या बाजूला फेकले….

abhishek bakkewad
4 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा  प्रतिनिधी/अशोक वाघमारे.

नांदेड – बिलोली तालुक्यातील मौजे लोहगाव येथील गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून कुंभारगाव येथील मारुती शेळके व हुस्सा येथील अंकुश वाघमारे यांना जबर व बेदम मारहाण करून अंकुश वाघमारे यांना रोडच्या बाजूला नाल्यात टाकल्याची घटना दिनांक 3- 10 -2023 रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास लोहगाव लागत असलेल्या दीपसाई पेट्रोल पंपा समोर घढली आहे.
सदर घटनेत मारुती शेळके व अंकुश वाघमारे आणि गंगाधर शेळके यांनी नरसिंहून कुंभारगाव येथे घरी परतत असताना लोहगाव फाटा येथे असलेले व्यंकट माळी यांचे आमलेट पावच्या गाड्यावर आमलेट खाऊन झाल्यावर त्यांचे बिल अंकुश वाघमारे यांनी देत असताना मागच्या बाजूने येऊन कुठलेच कारण नसताना लोहगाव येथील सुशील सिंगनवाड व त्यांचे सहकारी मिळून अंकुश वाघमारे व मारुती शेळके यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. सदर मारहानीत मारुती शेळके यांना सुशील शिंगणवाड यांनी हॉटेलमधील लोखंडे रॉड काढून रॉडच्या साह्याने कमरेत व पाठीत जबर मारहाण करून व सुशील सिंघानवाड यांचे सहकारी मिळून मारुती शेळके यांना खुर्चीच्या साह्याने डोक्यात व शरीराच्या इतर भागांमध्ये मारहाण करून गंभीर जखमी केल्याच दिसून येत आहे यात मारहाणी मध्ये रक्तस्त्राव होताच त्यांना ते रक्त पुसण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती. आणि मारुती शेळके यांचे डोळे देखील चमच्याच्या साह्याने काढण्याचे प्रयत्न देखील करण्यात आले होते. पण सुदैवाने मारुती शेळके हे थोडक्यात बचावले आहे. तर या घटनेतील अंकुश वाघमारे यांना पाच ते सहा जनाने लाथा बुक्या व दगडाच्या साह्याने अंकुश वाघमारे यांना उबडे पाडून त्यांच्या मानेवर व पाठीवर दगडाने ठेचून त्यांना बेशुस्त अवस्थेत रस्त्याच्या बाजूला नाल्या मध्ये फेकले आहे. तर या घटनेत मारुती शेळके यांच्याकडून रोख रक्कम 5000 रुपये जवळपास असलेली व बोटाला असलेली सोन्याची अंगठी देखील काढून घेण्यात आली आणि अंकुश वाघमारे यांच्याकडे रोख रक्कम पण 13 ते 14 हजार रुपये ऑनराईड मोबाइल हिसकाहून घेऊन जीव मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकंदरीत पाहता लोहगाव व फाटा येथे अशा गुंड व दरोडेखोरांचे दहशत निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
सदर घटनेत मारहाण होताच अंकुश वाघमारे व मारुती शेळके यांनी आरडाओरड केली असता मारुती शेळके यांचे सासरे लोहगाव येथील पांडुरंग गोविंद गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत आले असता तेथील परिस्थिती पाहून संबंधित पोलीस स्टेशनला कळविले असता रामतीर्थ येथील पोलीस कर्मचारी घटना स्थळी लवकर धाव घेऊन येतात लोहगाव येथील गुंड व्यक्ती फरार झाले आहे. तर अशा गुंड प्रवृत्तीच्या टोळीना पोलीस प्रशासन आळा घालेल का अशी चर्चा आता परिसरातून होताना दिसून येत आहे.आणि यात गंभीर जखमी असलेल्या दोन मुलांना ॲम्बुलन्स करून थेट नांदेड येथील निर्मळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आणि त्या हॉस्पिटलमध्ये तब्ब्ल दोन ते तीन दिवस उपचार घेऊन जखमी व्यक्ती व त्यांचे नातेवाईक थेट रामतीर्थ पोलीस स्टेशन मध्ये येऊन गुन्ह्याची नोंद केली आहे.
सदर गुन्ह्यात लोहगाव येथील व्यंकट माळी, सुशील सिंगनवाड, दीपक मारुती अनंतवाड,व साईनाथ सिंगलवाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 अधिनियमानुसार कलम, 326 324 323 504 506 34 अन्वये दिनांक 6- 10- 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून . सदर गुन्ह्यांची नोंद रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मा.श्री दिघे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मा.श्री शेख साहेब यांनी करून घेतले तर यातील काही संसयित असलेले यांचा पुढील तपास मा.श्री दिघे साहेब व मा.शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

Share This Article
error: Content is protected !!