हिमायतनगर प्रतिनिधी/बाबाराव जरगेवाड
हिमायतनगर – तालुक्यातील मौजे बळीराम तांडा येथे दिनांक ०७ आक्टोबंर रोजी भरदुपारी दहा ते वीस अनओळखी जणांनी सौ. अश्विनी अंबादास आडे रा.बळीराम तांडा हे आपल्या राहत्या घरी असताना,अचानकपणे जोर जबरदस्तीने,अनाधिकृतरित्या घरात प्रवेश केला.तर त्यांच्या हातात धारदार शस्त्रे,लोखंडी रॉड व लाठ्याकाठ्या घेऊन अचानक घेराव घालून घालत, माझ्या डोक्यात,दंडावर,पाठीवर आणि नाकावर एका धारदार शस्त्राने सामुहिक हल्ला करून मला गंभीर जखमी केलेआहे.माझ्या घरातील कपाटात ठेवलेले सोनेचांदीचे दागदागिने सह एकुण नगदी रक्कम मिळुन अडीच लक्ष रुपयाचा माल जबरीने चोरून नेला आहे.दरोडा टाकते वेळेस आरोपीने माझा विनयभंग केल्याची फिर्याद दाखल झाल्या नंतर रात्रीला आरोपी विरुद्ध भादंवी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.तसेच घरासमोरील उभी असलेली मोटार सायकल क्रमांक एम एच -२६बी ००३८गाडीचे एकूण ४६,०००/-रुपयाचे नुकसान केले आहे.अशी महिलेच्या फिर्यादी वरुन आरोपी सुजीत मधुकर राठोड,विशाल मधुकर राठोड,मधुकर वसंत जाधव रा.सर्व बळीराम तांडा तर सोनु चव्हाण, लखन रामदास चव्हाण यांच्या सोबतीने असलेले ईतर अनओळखी दहा ते बारा जणावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे पोटा बु.परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालेआहे.दहा ते वीस जणांच्या टोळीने दिवसाढवळ्या टाकलेल्या दरोड्यांमुळे गावात भीती निर्माण झालेली आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिरप्पा भूसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सविता जाधव,बीट जमादार नामदेव पोटे हे अधिकचा तपास करीतआहेत.