हिमायतनगर शहर प्रतिनिधी/लक्ष्मण भैरेवाड
हिमायतनगर – तालुक्यातील जि.प.प्रा. शाळा बोरगडी ता. हिमायतनगर जि. नांदेड या वर्षी घेण्यात आलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये चांगले गुण घेऊन प्रवेश पात्र झालेली जि.प.प्रा. शाळा बोरगडी शाळेचे विद्यार्थी चि.चिन्मय दिगांबर शैनेवाड यांनी आई वडीलांच्या कष्टाची जाणीव ठेवून अतिशय मेहनतीने अभ्यास करून बोरगडी या गावातील सर्वसाधारण कुटुंबातील चिन्मय दिगांबर शैनेवाड या विद्यार्थ्या नवोदय परीक्षा घवघवीत यश संपादन केले आहे.
सौ.रुक्मिणी दिगांबर शैनेवाड आई-वडील यांनी आपल्या मुलाला जि.प्र.शाळा बोरगडी व तसेच चांगले मार्क्स मिळाले म्हणून हिमायतनगर शहरातील माने सर यांचे ज्ञानसाधना कोचिंग क्लासेस मध्ये मार्गदर्शन घेतले आहे, जिल्हा परिषद शाळेमध्ये वेळोवेळी विद्यार्थ्यांना दिलेली प्रेरणा यामुळे हे घवघवीत यश प्राप्त करता आले आहे.
चि.चिन्मय दिगंबर शैनेवाड यांचा श्रीक्षेत्र बोरगडी जि.प्र. शाळेच्या वतिने, सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक श्री.शिरगिरे सर, वर्गशिक्षक जाधव सर,के.बी.शैनेवाड सर, सुधाकर काईतवाड, विठ्ठल शैनेवाड व सर्व शिक्षक आणि गावातील शिक्षण प्रेमी नागरिक बांधव मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.