नाशिक जिल्हा प्रतिनिधी/
नाशिक – ज्यांच्या डोक्यावरचे हंडे रिकामे असतात. ते आयुष्यात डचमळतात. ज्यांच्या डोक्यावरचे हंडे भरलेले आहे. ते कुठल्याही संकटात डचमळत नाही. म्हणून डोक्यावरचा हंडा भरून घ्यायचा असेल . तर चांगली पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. वाचन संस्कृती जोपासणे गरजेचे आहे. ललित साहित्याबरोबर वैचारिक साहित्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरते. आयुष्याला ताल आणि लईसोबत योग्य दिशा मिळते. म्हणून पुस्तक वाचत रहा. स्वतःला समृद्ध करा असे आवाहन प्रसिद्ध कवी प्रा. संदीप जगताप यांनी विद्यार्थ्यांना केले. ते वडनेर भैरव महाविद्यालयात मराठी आणि इंग्रजी वांडग्मय मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य ए.एल. भगत होते. यावेळी विचार पिठावर प्रा. एन डी वडघुले, प्रा. आर. एम. भोज , प्रा. व्हि. वाय. वाघ उपस्थित होते.
या याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना संदीप जगताप यांनी आपल्या खुमासदार शैलीमध्ये अनेक कविता किस्से सांगत विद्यार्थ्यांची मन जिंकले. हसवता हसवता समाजातल्या अनेक रूढी परंपरांवर आणि आज जाती-धर्मात असणाऱ्या भांडणांवर संदीप जगताप यांनी हल्ला केला. समाजातल्या भुकेच्या प्रश्र्नांपेक्षा जाती-धर्मांमध्ये द्वेष पसरवने सुरू आहे. मतांचे राजकारण करत असताना शेतकरी आणि गोरगरिबाला मात्र पायाखाली तुडवले जात आहे. याकडे विद्यार्थ्यांनी या देशाचे सजक नागरिक म्हणून गांभीर्याने पाहायला हवं .अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य भगत यांनी वांग्मय मंडळाचे उद्घाटनाचे ध्येय व वर्षभर राबवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांचे नियोजन विद्यार्थ्यांना सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभाग प्रमुख ए के ठाकरे यांनी केले तर आभार मराठी विभाग प्रमुख प्र एस एस जाधव यांनी मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरुवातीला संदीप जगताप यांच्या तुझ्या लग्नाला येता आलं नाही. या प्रेम कवितेने प्रचंड टाळ्या घेतल्या. व समारोपाला बहिणीच्या लग्नाची सीडी या कवितेने विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. संपूर्ण व्याख्यानात संदीप जगताप यांनी हसवता हसवता विद्यार्थ्यांना चिमटे काढले. शेतकऱ्यांच्या दुःख वेदने वरील कविताना देखील विद्यार्थ्यांनी जोरदार प्रतिसाद दिला.