नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड : जिल्यातील धर्माबाद शहरात
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे खंदे समर्थक काँग्रेस अनुसूचीत जाती विभागाचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष मंगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त धर्माबाद येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
बहुजन समाजातील सर्व सामान्याचे बुलंद आवाज काँग्रेस अनुसूचीत जाती विभागाचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष मंगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मंगेश कदम मित्र मंडळ धर्माबाद यांच्या वतीने आज धर्माबाद शासकीय ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.डॉ. रवी वावळे डॉ.कल्याणकर यांच्या उपस्थितीमध्ये रुग्णांना जीवनावश्यक वस्तू व फळे वाटप करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार चंद्रभीम हौजेकर,डॉ.सुधीर येलमे, रामा सोनकांबळे ,विकास गायकवाड,गंगाधर वाघमारे, मनोहर सोनटके,आदि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.डॉ. रवी वावळे डॉ.कल्याणकर यांच्या उपस्थितीमध्ये रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.