सिडको ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने उमाकांत पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नवीन नांदेड प्रतिनिधी/
नांदेड – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे अत्यंत निकटवर्तीय व विश्वास म्हणून ओळखले जाणारे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ तथा नांदेड जिल्हा काँग्रेस पक्ष कार्यालयीन सचिव उमाकांत पवार यांचा वाढदिवस सिडको वाघाळा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने अतिशय उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिडको ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष विनोद कांचनगिरे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नेते डॉ. नरेश
रायेवार, डॉ. अशोक कलंत्री, भी. ना. गायकवाड, राजू लांडगे, यांनी उमाकांत पवार यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात विनोद कांचनगिरे यांनी महाराष्ट्राचे लोकनेते अशोकराव चव्हाण यांचे खंदे समर्थक उमाकांत पवार साहेब हे काँग्रेस पक्षाचे व अशोकराव चव्हाण साहेब यांचे कार्य निष्ठेने समाजातील तळागाळातील लोकापर्यंत पोहोचवितात व भविष्यात त्यांना अधिक कार्य करण्याची ऊर्जा मिळावी हीच वाढदिवसाची शुभेच्छा देतो अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. यावेळी सत्काराला उत्तर देताना उमाकांत पवार म्हणाले की श्रद्धेय शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या सहवासात राहून काँग्रेस पक्ष बळकटी करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी माझ्यावर जी काही जबाबदारी दिली ती मी प्रामाणिकपणे इमाने इतबारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे व परत एकदा साहेबांना मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे हीच माझ्या वाढदिवशी भगवंता चरणी प्रार्थना करतो. अशी भावना त्यांनी यावेळी वाढदिवसाच्या सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली.
या वेळी भीमराव गायकवाड डॉ.अशोक कलंत्री,
डॉ.नरेश रायेवार, शेख लतीफ,
देविदास कदम, मोहम्मद नुरोद्दीन, शेख मोईन लाटकर, भुजंग स्वामी, पांडे साहेब, काशिनाथ गरड, कुलकर्णी, विश्वनाथ शिंदे, गंगाधर मानकर, संतोष कांचनगिरे, राजू लांडगे, एस पी कुंभार, विमलबाई चित्ते, मीराबाई प्रकाश भालेराव, अनिता गज्जेवार, सुनंदा, विमलबाई चित्ते, नामदेव पद्मने, प्रभू राम, भगवान, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. शशिकांत हटकर यांनी केले. या कार्यक्रमाला सिडको भागातील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Share This Article
error: Content is protected !!