हिमायतनगर प्रतिनिधी /बाबाराव जरगेवाड
हिमायतनगर – महाराष्ट्रातील माळी समाजाचे नेते, माजी उपमुख्यमंत्री तथा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री मा.ना.छगनजी भुजबळ यांच्यावर सोशल मीडियातील फेसबुकवर अश्लील भाषेत कॉमेट पोस्ट प्रकरणी समस्त तालुका ओबीसी तथा माळी समाज बांधवाकडून या कॉमेडीचा जाहीर निषेध व्यक्त करून या प्रकरणाची कायदेशीर चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावाअशी अशी मागणी करण्यात आली आहे. हिमायतनगर तालुका माळी समाज बांधवांनी पोलीस निरीक्षक बिरप्पा भूसनुर यांच्याकडे निवेदन देऊन भावना दुखावल्या गेल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे.संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय सुरु असताना विनाकारण तालुक्यातील मौजे कामारी येथील एका तरुण युवकाने तालुक्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद पेटुन समाजा समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने जाणुन-बुजून सोशल मीडियातील फेसबुकवर माळी समाजाचे जेष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या विषयी खालच्या पातळीवर टीका करीत अश्लील भाषेत पोस्ट लिहुन प्रसारीत केली आहे.त्यामुळे संपूर्ण समस्त हिमायतनगर तालुका सकल ओबीसी समाज व माळी समाजाच्या भावना दुखावल्याआहेत.या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ संबंधित दोषींवर चौकशीअंती फेसबुक चालवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्या व्यक्तीला त्वरित अटक करण्यात यावी.अन्यथा सर्व समस्त सकल माळी समाजाच्यावतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा सुद्धा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.या निवेदनावर जेष्ठ कार्यकर्ते सुभाष शिंदे,कॉम्रेड दिगांबर काळे,शाम ढगे,परमेश्वर काळे,सावंत राऊत,अनिल नाईक, गणेश दळवी,भारत डाके,अभिषेक लुटे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.