नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड : येथील युवक काँग्रेसचे मोहसीन लालानी यांची अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असुन ..त्यांनी यापुर्वीही 2017 च्या नांदेड वाघाळा महानगरपालिका,2019 लोकसभा आणि विधानसभा निवडनुकीत काँग्रेस पक्षासाठी स्थानिक पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्य केले शिवाय नांदेड शहरातील करीमाबाद सोसायटी विकास कामात सतत अग्रेसर राहणारे मोसिन लालानी यांची अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल नांदेड युवक काँग्रेस माजी अध्यक्ष अजिज लालानी, माजी उपमहापौर शमीम अब्दुल्ला,माजी नगरसेवक धीरज यादव,माजी नगरसेवक तुलजेश यादव,माजी नगरसेवक हबीबभाई बाबाअजिर, कबीरोदिन जसानी,अमीरअली लालानी,अली पंजवाणी,सिराज लालानी यांच्या सह सर्व स्तरातील पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक यांच्या कडून अभिनंदन होत आहे.