प्रा.पुंडलिक वाघमारे सर डॉ.एम.एस. स्वामिनाथन या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित…! ग्रामीण कृषीशास्त्रातील त्यांच्या योगदानाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल..!! 

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नायगाव ता प्रतिनिधी /अशोक वाघमारे 

नायगाव – वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,परभणी येथील Agronomy या विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले व नायगाव तालुक्यातील मौजे हुस्सा गावातील सामान्य कुटुंबात जन्माला आलेले. व हलकीच्या परिस्तिथी वर मात करून जिद्धी व चिकाटी ने मेहनत करून समाजाचे व हुस्सा गावाचे नाव लवकिक करणारे. व हुस्सा गावातील सर्वात अभ्यासू व प्रेमळ, आणि लघवी बोलणे यातून सुपरिश्चित असलेले आणि विशषता समाजातील युवकांच्या शिक्षणात भर घालणारे अशी त्यांची ओळख मराठवाढ्यातील सर्वच कृषी क्षेत्रात ठसा उमठला आहे आणि सध्या नवसारी, गुजरात येथे संशोधन करता असलेले प्रा पुंडलिक वाघमारे सरांना हरित क्रांतीचे जनक म्हणून जगभर ज्यांची ख्याती आहे असे महान कृषि शास्त्रज्ञ डॉ एम एस स्वामीनाथन यांच्या नावाने दिला जाणारा कृषि क्षेत्रांतील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा Dr M.S. Swaminathan Award. जाहीर झाला आहे, याचा अभिमान व आनंद वाटतो.

 

‘Global insights on Resarch and Development in Agriculture, Horticulture and Alliied Science’ या विषयावर दि.5,7 ऑक्टोबर 2023 रोजी G H Raisoni University, Saikheda (M.P) व AEEFWS, Chandigarh यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आंतररा्ट्रीय परिषदेत प्रा. पुंडलिक वाघमारे सरांना त्यांच्या कृषीशास्त्रातील योगदानाबद्दल व त्यांच्या व्यसांगाबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे.कृषि विज्ञान, अन्न आणि फायबर उत्पादन आणि प्रक्रिया यांच्याशी संबंधित विज्ञान,मातीची मशागत,फलोत्पादन, उद्यानविद्या इ. व शेती आणि शेतीतील ग्रामीण विकासाला चालना देणारे संशोधन.कार्यात प्रा.वाघमारे सरांचं कार्य सर्वश्रुत आहे.एक अभ्यासू, संशोनात्मक दृष्टी असणार कृषि क्षेत्रात समर्पण देणार व्यक्तिमत्व म्हणून सरांची ओळख आहे.या पूर्वी त्यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार हैद्राबाद येथे जाहीर झाला होता.

 

एक व्यक्ती म्हणून सुस्वभावी,प्रेमळ व समाजाभिमुख व्यक्तिमत्व .युवकांचे आयडॉल, उत्कृष्ट व्याख्याते रचनात्मक सामाजिक कार्यासाठी सदैव पुढे असणारे व लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे महासचिव म्हणून त्यांची भुमिका प्रेरणादायी आहे.

 

आदरणीय प्रा पुंडलिक वाघमारे सरांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सर्वच क्षेत्रातून देण्यात आल्या आहेत.

Share This Article
error: Content is protected !!