जिल्हा प्रतिनिधी
नांदेड – अंतरवाली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्यां आमरण उपोषणाला आज रविवारी पाच दिवस झाले असून त्यांची प्रकृती खालावली आहे. परंतु सरकार अजूनही आरक्षणाविषयी ठोस निर्णय घेण्यासाठी समोर आल्याचे दिसत नसल्यामुळे सरकार आणखी किती निष्पाप मराठा समाजाच्या लोकांचा जीव घेणार असल्याचा संताप सामाजिक कार्यकर्ते तथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेशअध्यक्ष श्री पंडित तिडके यांनी व्यक्त केला आहे. सरकारने वेळोवेळी मराठा समाजाची चेष्टा सुरु केलेली असून मराठा समाजाने सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली आहे . सरकार मराठ्यांची दिशाभूल करीत आहे महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे केवळ मराठवाड्यातील मराठ्यांनाच द्यायचे आणि बाकी सोडायचे हे चुकीचे आहे . केवळ रेकॉर्डला कुणबी नोंद असणाऱ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र द्यायचे आणि बाकीच्यांना द्यायचे नाही असं अजिबात चालणार नाही. इतर समाजाला आरक्षण देतानां कोणत्या बाबींचा आधार घेतला याचा विचार करावा. सरकारने विनाकारण शब्दांचा खेळ खेळू नये कारण मराठ्यांच्याच महाराष्ट्रामध्ये मराठ्यांवर ही भीक मागण्याची वेळ येत असेल तर ही बाब निश्चितच शर्मेने मान खाली घालणारी असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते श्री पंडित तिडके यांनी योक्त केले आहे. स्वतंत्र मिळाल्यापासून राज्यातील मराठा समाजासह इतरही समाजाचा राजकीय पुढाऱ्यांनी केवळ आपल्या वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी उपयोग केला असून वापरा आणि फेकून द्या असाच वापर राज्यातील जनतेचा राज्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोपही त्यांनी केला . मराठ्यांना आरक्षण देण्याची वेळ आल्यानंतर केवळ ओबीसींच्याच मतावर आम्ही निवडून येत असल्याचे वक्तव्य सरकारमधील काही जबाबदार वाचाळवीर करत आहेत. त्यामुळे असे समाजात सरकारविरोधात असंतोष निर्माण करण्याचं काम काही लोक करत आहेत.परंतु ते मात्र मराठे असुच शकत नाहीत. सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये सरकार म्हणजे राजकीय पुढारी असा छळ समाजाचा का करतात याचा विचार करणे गरजेचे आहे. आपलेच मराठा आमदार नेते आपलाच विश्वासघात करत आहेत यांना नेमकं काय साध्य करायचं आहे मराठाच नाही तर सर्वच नेते केवळ वैयक्तिक स्वार्थ पाहत आहेत. जनतेशी कोणते स्वयरसुतक त्यांना नाही केवळ जनतेची दिशाभूल करून सत्ता भोगायची आणि त्यांच्या दहा पिढ्यांची कमाई करायची. जनतेशी बेइमानी करून सत्ता भोगायची सत्तर वर्षात राजकीय नेत्यांनी जनतेसाठी काय केले त्याची कबुली नेत्यांनी द्यावी. केवळ मतदानासाठी जनतेचा वापर केला आणि फेकून दिले आपण आपल्याच लोकांना फसवीत आहोत याची थोडीफार वाटायला पाहिजे! परंतु राज्यातील मराठ्यांसह सर्व धर्मीय जनतेच्या हाती फार मोठी संधी आली असून राजकीय नेत्यांचा हिशेब चुकता करण्याची व त्यांना हद्दपार करण्याची एक नामी संधी राज्यातील नागरिकांना आली आहे. राज्यातील जनतेने राज्यकर्त्यांच्या आमिषाला बळी न पडता येणाऱ्या काळात बदल करून त्यांची जागा दाखवावी असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष श्री पंडित तिडके यांनी केले आहे.
आजपर्यंतच्या राजकारणाचा विचार केल्यास गेल्या दहा वर्षात राजकारणाचा दर्जा पार घसरला असून राज्यातील तरुण पिढीला व्यसनाधीन करून सत्ता मिळवण्याचे प्रकार दिसून येतात. राजकारणात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खोटे बोलून भ्रष्टाचार करून जनतेची फसवणूक करणारे राज्यकर्ते ज्या देशात असतील त्या देशाचा त्या राज्याचा विकास होणार तरी कसा ? तसेही सध्याच्या राजकीय नेत्यांचा विकासाशी दुर दुर पर्यंत कोणताही संबंध नाही. त्यांचा वैयक्तिक विकास यालाच प्राधान्य दिले जात आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता उपभोगणे हा एक कलमी कार्यक्रम मात्र लोकप्रतिनिधी करत असल्याचे दिसून येत आहे ही परंतु आता मात्र वेळ आली आहे या राज्यातील जनतेने कार्यकर्त्यांच्या काळ्या कर्तुत्वाला कायमचा पूर्णविराम देण्याची. काहीही बदल न करता मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र प्रदान करावे आणि या प्रश्नाला कायमस्वरूपी पुर्णविराम द्यावा.शासनाने मराठा समाजाला वेठीस धरू नये असे त्यांनी म्हटले आहे . मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात शासन गांभीर्याने घेत नाही, आपल्या जीवाची पर्वा न करता जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देत आहेत परंतु सरकार मात्र रोज काहीतरी नवनवीन खेळ खेळत आहे.परंतु गाठ मराठा समाजाशी आहे हे लक्षात ठेवावे असे त्यांनी राजकीय नेत्यांना ठणकावून सांगितले आहे.राज्यातील मराठा समाजाच्या नेत्यांवरही जनतेचा विश्वास राहिलेला नाही.त्यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे.केवळ सत्तेसाठी पाय चाटणारे मराठे असुच शकत नाही.मराठा स्वाभिमान विकत नाही.मराठा खडा तो, सरकार से बडा तोच खरा मराठा असतो हे मात्र नक्की.