शेतकरी नेते व लोकनेते श्री मारोतराव कोळे गुरुजी यांच्या संकल्पनेतून दिपावली निमित्त पत्रकारांचा विशेष सन्मान सोहळा व स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न…

abhishek bakkewad
4 Min Read
Spread the love

 

जिल्हा प्रतिनिधी नांदेड/अशोक वाघमारे 
नांदेड – धर्माबाद तालुक्यातील मौजे वाघलवाडा येथील व्ही पी के उद्योग समूहाच्या वतीने व श्री मारोतराव कवळे गुरुजी यांच्या संकल्पनेतून नायगाव उमरी धर्माबाद तालुक्यातील असंख्य पत्रकारांचा विशेष सन्मान सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यात विविध पत्रकार मान्यवर मंडळी व कार्यकर्ते यांचे मार्गदर्शन देखील ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान श्री मारोतराव कोळी गुरुजी यांचे मुख्य मार्गदर्शन ठेवले असून या कार्यक्रमात कार्यकर्त्याकडून व पत्रकार बांधवाकडून श्री कवळे गुरुजी यांचे विविध शब्द सुमनाने तोंड भरून कौतुक करण्यात आले आहे. श्री मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांनी मतदार संघातील जनसामाने व शेतकऱ्यांसाठी अहो रात्र प्रयत्नशील असतात आणि या भागातील कमीत कमी पाच हजार युवकांना काम करण्याची संधी प्राप्त करून दिली आहे बेरोजगारांच्या हाताला काम लावण्याचे काम एकंदरीत कवडे गुरुजी यांनी या भागात मोठ्या प्रमाणात केले आहे.
सदर कार्यक्रमात श्री कवळे गुरुजी यांनी पत्रकारांना दीपावलीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. श्री कवडे गुरुजी यांनी पत्रकारांना शुभेच्छा देत असताना भारतीय लोकशाहीमध्ये पत्रकारांना किती महत्त्व आहे याचा मी जवळून अभ्यास केलेला आहे पत्रकार हा भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून याच पत्रकारांचा सन्मान करण्याची संधी मला मिळाली हेच माझे खरे भाग्य समजतो आणि त्यातच मी धन्यता देखील मानतो. या भागातील शेतकरी सुशिक्षित बेरोजगार व मजूर यांनी सुखाचे जीवन जोपर्यंत जगणार नाही तोपर्यंत मी या भागामध्ये असेच कार्य करीत राहील. असेही कवडे गुरुजी यांनी म्हणाले.
उपस्थित कार्यक्रमांमध्ये पत्रकारांच्या महत्त्व बरोबर भागातील शेतकऱ्या विषयी देखील सखोल मार्गदर्शन करण्यात आले आहे. यात मी विरोधकावर टीका करण्या पेक्षा या भागातील जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यात मी प्रयत्नशील असतो आणि जनतेच्या हितासाठी काम करायला मी तत्पर आहे असे देखील कवडे गुरुजी यांनी म्हणाले आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ जर करायची असेल तर जोड धंदा करणे गरजेचे आहे जोडधंदा असा करा की ऊस उत्पादनाबरोबर दुग्ध व्यवसायातून अधिक उत्पन्न वाढते आणि दुग्धजन्य जनावरांपासून मिळणारा खत व गोमूत्र यापासून शेतातील जमिनीला पोषक अशा प्रकारे एनर्जी मिळते त्यातून ऊस उत्पादनात वाढ होते आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये देखील वाढ होतो आहे. यामुळे आपल्या भागातील शेतकरी आत्महत्या करण्याच्या मार्गी लागत नाही. आणि शेतकरी यात सुखी व समृद्ध जीवन जगतो आहे. अशा विविध विषयांचे सखोल मार्गदर्शन श्री कवळे गुरुजी यांच्याकडून उपस्थितांना करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमात उमरी धर्माबाद नायगाव येथील पत्रकार प्रतिनिधी म्हणून मार्गदर्शन देखील करण्यात आले आहे उपस्थित पत्रकाराकडून श्री कवळे गुरुजी यांचे तोंड भरून कौतुक करण्यात आले असून आयुष्यात राजकीय व व्यावसायिक शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत. यात अनेक पत्रकारांनी श्री मारोतराव कोळी गुरुजी यांनी नायगाव विधानसभेचे आमदार म्हणून आम्हाला बघायला आवडेल व यात काही पत्रकारांनी 2024 चे 100% आमदार राहणार असा देखील विश्वास असल्याचे सांगण्यात आले आहे. श्री मारोतराव कोळी गुरुजी यांच्यासारखे दिलदार व दिलखुलास व्यक्तिमत्व नायगाव विधानसभा क्षेत्रात सापडणार नाही. श्री कवळे गुरुजी यांनी नायगाव विधानसभेचे पुढील काळात नेतृत्व करतील असं आत्मविश्वास देखील सर्व पत्रकारांच्या वतीने दाखविण्यात आला आहे.
उपस्थित कार्यक्रमाला रिपीके उद्योग समूहाचे चेअरमन श्री मारोतराव पा. कवळे गुरुजी, श्री बनाळीकर, श्री संजयजी कुलकर्णी,श्री जगदंबे पाटील, श्री संदीप पाटील कवळे श्रीपरमेश्वर पाटील कवळे यासह नायगाव विधानसभेतील कार्यकर्ते शेतकरी व मोठ्या प्रमाणात पत्रकार बांधव उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!