नांदेड प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नांदेड – नायगाव तालुक्यातील मौजे मोर इकली येथील श्री साहेबराव लक्ष्मणराव मोरे यांची सरपंच पदी निवड तर श्री तिरुपती रावसाहेब मोरे यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल इकली मोर येथील सर्वच समाज बांधवाकडून शुभेच्छा देण्यात आले आहेत आणि सदर निवडी बदल आनंद व्यक्त देखील करण्यात आले आहे. सदर निवड झालेल्या व्यक्तींची श्री गजानन पाटील चव्हाण व श्री भाऊराव पाटील चव्हाण यांच्या कडून नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांचा सन्मान करून पुढील कार्यास शुभेच्छा देखील देण्यात आले आहेत. उपस्थित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते यशवंत भेद्ये सुरेश भेदे पोलीस पाटील ताकबिरकर गणेश शारदे सामाजिक कार्यकर्ते सेक इस्माईल पठाण, किशोर महाराज कार्लेकर, धर्माबादकर, गजानन पाटील सातेगावकर, भगवान खानसोळे, शिवाजी पाटील चव्हाण,प्रमोद बिरेवार, यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.