नवी मुंबई – मराठा आरक्षणासाठी जीवन संपवलेल्या 35 तरुणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत करण्यांत आली,राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आत्महत्या केली आहे. मराठा समाजातील तरुणांनी आरक्षणासाठी आत्महत्या करू नये आपल्याला आरक्षण मिळणारच आहे, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
दरम्यान आता मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या 35 तरुणांच्या कुटुंबीयांना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत केली आहे.
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या 35 तरुणांच्या कुटुंबीयांना भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून व तानाजी सावंत यांच्या वतीनं प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली. संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ही मदत कुटुंबीयांकडे सोपवण्यात आली. आरक्षणासाठी आत्महत्या हा अंतिम पर्याय नाही. सरकार त्यांचं काम करत आहे. मात्र मराठा तरुणांनी टोकाची भूमिका घेऊ नये असं मत यावेळी बोलताना तानाजी सावंत यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान यावेळी धनगर समाजातील दोन आत्महत्या केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना देखील मदत करण्यात आली आहे.
पुढे बोलताना सावंत यांनी म्हटलं की, आरक्षणासाठी आत्महत्या हा अंतिम पर्यात नाही. मराठी तरुणांनी टोकाची भूमिका घेऊ नये. आरक्षण आज न उद्या मिळेलच. मात्र घरातील कर्ता व्यक्ती जे कुटुंब गमावते, त्या कुटुंबाकडे कोणीही लक्ष देत नाही. आपल्या कुटुंबाला सावरण्यासाठी आत्महत्या करू नका ही कळकळीची विनंती, असं सावंत यांनी म्हटलं आहे.