आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील संगणक परिचालक यांचे थेट ग्रामविकास मंत्र्यांना पत्र पाठवून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा दिला इशारा…

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

 

 

हिमायतनगर प्रतिनिधी/

 हिमायतनगर  – नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक परिचारक यांचे माननीय ग्रामविकास मंत्री यांना पत्र पाठवून थेट कामबंद आंदोलनाचा इशारा एका लेखी पत्र द्वारे देण्यात आला आहे. हिमायत नगरच्या सर्व संगणक परिचारक आणि दिनांक 7 -11-2023 रोजी हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयामार्फत व ग्रामविकास मंत्री यांना पत्राच्या माध्यमातून थेट काम बंद चा इशारा देण्यात आला आहे.

सदर संगणक परिचालकाने गेले चार ते पाच वर्षापासून शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून देखील संगणक कामगारांची मागणी मान्य न होत असल्याने आता संगणक परिचालक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी शासनाच्या वतीने लेखी आश्वासित केले असता त्या लेकी आश्वासनाने वास्तविक अमलबजावणी किंवा पुढे कुठलाच निर्णय न झाल्याने संगणक परिचालक आता आंदोलनाच्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. संगणक परिचालक यांना संबंधित विभागाकडून संगणक परिचालक संदर्भात दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी बैठक लावण्यात आली होती या बैठकीत सुधारित आकृतीबंधाची फाईल वित्त विभागाकडे पाठविण्यात आली होती आणि वित्त विभागाकडून सदर आकृतीबंधाची तुरटी काढण्यात आली तर ग्राम विकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच माननीय विभागीय आयुक्त यांच्याकडून 15 दिवसात अभिप्राय देण्याचा सूचना केल्या असता परंतु 155 दिवस झाले तरी अद्याप सरकार निर्णय कुठलाच घेतला नसल्याचे माहिती असल्याचे दिसून येत आहे. संगणक परिचालकांना तुटपुंजी मानधन देऊन परिचलकांची हास मुस्की करत असल्याची खंत देखील परिचलकाकडून करण्यात आली आहे.

सदर विषयात कोतवाल पोलीस पाटील अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर व गटप्रवर्तक यांचे मानधन वाढले पण यात संगणक परिचालक यांचे मानधन मात्र वाढले नसल्याने आता हिमायतनगर तालुक्यातील व सबंध राज्यातील सर्व संगणक परिचलकांकडून नाराजी होताना दिसून येत आहे. सदर संगणक चालकांची मागणी मान्य झाल्यास दिनांक 10 नोव्हेंबर 2023 पासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे संगणक परिचालक यांच्याकडून गेले अनेक वर्षापासून ची मागणी असलेले संगणक परिचालक यांना कर्मचारी दर्जा देण्यात यावा वेतन 20000 रुपये देण्यात यावे नियुक्ती झालेल्या कामगारास ज्यांचे मानधन मागील महिन्यापासून रखडलेले आहे अशा चे मागील महिन्यापासून मानधन देण्यात यावे. अशा विविध मागण्या घेत हिमायतनगर व जिल्ह्यातील सर्वच संगणक परिचालक यांनी बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे, यावेळी उपस्थित संगणक परिचालक संघटना हिमायतनगर तालुका अध्यक्ष रमेश सरपे. तालुका उपाध्यक्ष मारोती गाडेकर, सचिव,नागसेन गोखले, विशाखा भरणे,ज्ञानेश्वर माने, नितेश कोरपटवाड व सर्व संगणक परिचालक उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!