बालाजी बलपेलवाड यांच दू:खद निधन!

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

हिमायतनगर ता.प्रतिनिधी /जरगेवाड बाबाराव

हिमायतनगर : येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी बलपेलवाड यांच रवीवारच्या रात्री उशिरा निधन झाले आहे. बालाजी बलपेलवाड यांची आठ महिन्यांपूर्वी ह्रदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. त्या शस्त्र क्रियेत बालाजी बलपेलवाड यांनी विजय मिळविला होता.तबेत पुर्णपणे मजबूत होत आसतांना . अचानक पणे रविवारी च्या संध्याकाळी श्वास सो श्वास घेण्यासाठी त्रास होत होता.त्यांचे छोटे बंधू दत्ता शेठ बलपेलवाड यांनी नांदेड येथील ग्लोबल रुग्णालयात दाखल केले परंतु, त्यांना तब्येत साथ देत नसल्याने रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मावळली आहे.
त्यांनी स्वःता शून्यातून विश्व निर्माण केले होते.ते एक कूशल व्यापारी व सामाजिक कार्यात राजकीय क्षेत्रात त्यांनी एक प्रकारे मजबूत छाप निर्माण केली होती. ते एक प्रकारे स्वयंप्रकाशित व्यक्ती महत्व होते.त्यांनी आपल्या कर्तृत्वाने पदे स्वीकारली व पार पाडली.ते प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष होते तर गोल्ला गोलेवार समाज संघटनेचे हिमायतनगर तालुकाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी पदभार स्वीकारला होता.

Share This Article
error: Content is protected !!