वंजारवाडी येथील 17 वर्षांचा मुलीवर 40 वर्ष असलेल्या व्यक्तीने केला बलात्कार

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

दोन दिवसापासून मुलगी दवाखान्यात ऍडमिट आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यातील नायगाव तालुक्या मधील कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे वंजारवाडी तालुका नायगाव येथील आरोपी योगेश भीमराव कोंडेवाड वय वर्ष 40 राहणार वंजारवाडी या आरोपीने शेजारीच असलेल्या 17 वर्षे वय असलेल्या मुलीचा घरी एकटी पाहून मुलेचे आई व भाऊ नायगावला गेले असता मागच्या दाराने येऊन सदर मुलीस अत्याचार,बलात्कार करण्यात आला सदर मुलगी हे 17 वर्षे अल्पवयीन असून अपंगही आहे.सदर मुलगी अपंग आहे.ही माहीत असूनही तिच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार करण्यात आला .आरोपी योगेश भीमराव कोंडेवाड यास कुंटुर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

योगेश कोंडेवाड हा वंजारवाडी येथील पीडित मुलीच्या शेजारी राहतो व त्यांचे शेती वाटाने करतो त्यामुळे येजा ओळख होती व सर्व घरच्यांच्या मंडळींना माहिती होते असे , फिर्यादीचे आहे व भाऊ यांनी माहिती दिली.
मुलगीचे आई,भाऊ नायगाव येथे बाजारासाठी गेले असता दिनांक 09/ 11/ 2023 रोजी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास एकटी पाहून आरोपीने घरात मागच्या दाराने येऊन घरात घुसून तिच्यावर अतिप्रसंगी केला.सदर पीडित मुलगी आई आल्यावर सांगल्यानंतर अति त्रास होऊन रक्तस्राव झाल्यामुळे पीडित मुलीला नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.असून तिची प्रकृती चांगले असल्याचे पोलिसांकडून माहिती मिळाली आहे.

सदर आरोपी योगेश कोंडेवाड यांच्या विरुद्ध कुंटूर पोलीस ठाण्यात यांनी फिर्याद दिल्यानंतर 376 (2) ( एल ) 452 भादवी 4.6.बाल लैंगिक शोषण अत्याचार अंतर्गत व अपंग मुलगी असल्याने अपंग अत्याचार कलम 92 ( ड ) अपंग अधिनियमनुसार दि.10-11-2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे हे करीत आहेत.

Share This Article
error: Content is protected !!