प्रियांका गांधी व अशोकराव चव्हाण यांचा एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

तेलंगणातील खानापूर व आसिफाबाद येथे प्रचार सभा

नांदेड – तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्यानिमित्ताने काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांचे एका विशेष विमानाने नांदेड विमानतळावर सकाळी 11 वाजता आगमन होणार असून त्यानंतर हेलिकॉप्टरने त्या माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह तेलंगणातील खानापूरकडे प्रयाण करणार आहेत.

तेलंगणातील खानापूर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार वेडमा भोजू यांच्या प्रचारात दुपारी 12 वाजता या उभय नेत्यांची जाहीर सभा आयोजित केली आहे. त्यानंतर दुपारी 1.30 वाजता आसिफाबाद येथील काँग्रेसचे उमेदवार अजमेरा शाम यांच्या प्रचारार्थ प्रियांका गांधी यांची सभा होणार असून या सभेतसुद्धा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सभेनंतर दोन्ही नेत्यांचे हेलिकॉप्टरमधून दुपारी 3.30 वाजता नांदेड येथील श्री गुरूगोविंदसिंघजी विमानतळावर आगमन होणार आहे.

त्यानंतर लगेच प्रियांका गांधी यांचे विशेष विमानाने प्रस्थान होणार असून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण तेलंगणातील निजामाबाद शहर व निजामाबाद ग्रामीण येथील उमेदवारांच्या प्रचारासाठी निजामाबादकडे मोटारीने प्रस्थान करणार आहेत. निजामाबाद येथे प्रचाराच्या बैठकांना व रोड शोला त्यांची उपस्थिती राहणार आहे.

Share This Article
error: Content is protected !!