जिल्हा प्रतिनिधी नांदेड/अशोक वाघमारे
नांदेड – शहरालगत असलेले पिंपळगाव मिस्त्री येथे आज आम्ही वारकरी परिवार नांदेड च्या वतीने भव्य आणि ऐतिहासिक सेवाभावी संस्थेची उदघाटन व कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. प्रारंभी श्री विठ्ठल रुक्मिणी आणि भगवानश्रीकृष्ण मूर्तीचे व कै. आनंदराव जी महाराज पुयड यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील मार्गदर्शक सल्लागार अध्यक्ष सचिव सहसचिव कार्याध्यक्ष यासह विविध पदाधिकारी यांचे नवनियुक्त वितरण सोहळा व तालुक्यातील सर्व स्तरावरील कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. आम्ही वारकरी परिवार नांदेड सेवाभावी संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील तमाम भाविक भक्तांना अध्यात्मिक विषयांचे ज्ञानाचे धडे देत व अध्यात्मिक कार्य कशा पद्धतीने करता येतो किंवा करण्याची पद्धत जीवनात मोक्ष प्राप्त करण्याच्या मार्गाने असलेली ज्ञान भक्ती आणि आम्ही वारकरी परिवार यांच्या माध्यमातून सबंध मानव जातीच्या कल्याणकारी समूह एकत्र आणण्याकरिता व मानव जातीचा उद्धार करण्याकरिता आम्ही वारकरी परिवार हे गेल्या अनेक वर्षापासून नांदेड जिल्ह्यात कार्यन्वित असून जिल्ह्यामध्ये काम करत असून गेल्या सहा वर्षांमध्ये आम्ही वारकरी परिवार या संस्थेमध्ये किमान 7000 च्या जवळपास सदस्य असून त्यामुळे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था हे अजून जोमाने काम सुरू केल्याचे दिसून येत आहे. आम्ही वारकरी परिवार संस्थेचे विचारधारा आणि वारंवार असलेले मार्गदर्शन यावर प्रभावित होऊन जिल्ह्यातील अनेक भाविक भक्त या संस्थेची जोडले जात आहे म्हणून या संस्थेचा विस्तार मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. म्हणून या वितरण सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही वारकरी परिवारांचे अध्यक्ष ह भ प राम महाराज पांगरेकर, उपाध्यक्ष ह भ प गंगाधर महाराज हंबर्डे, सचिव व्यंकटराव महाराज जाधव, सहसचिव ह भ प प्रभाकर महाराज पुयड, ह भ प माऊली महाराज काकांडी कर, यांच्या वतीने जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचा वितरण सोहळा संपन्न झाला आहे या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील भाविक भक्त उपस्थित होते तर यात मोठ्या प्रमाणात महिला देखील दिसून आले आहेत.