नायगाव येथे पवित्र कार्तिकी एकादशी निमित्त विनोदाचार्य ह.भ. प.प्रभाकर महाराज पुयड यांचे सुश्राव्य कीर्तन.

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे.

नायगाव – शहरात पवित्र कार्तिकी एकादशी निमित्त जागर हरी नामाचा कार्यक्रम अंतर्गत नायगाव शहरातील विठ्ठल रुक्मिणी हनुमान मंदिर जुने गाव येथे सुप्रसिद्ध व आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे जिल्हा सहसचिव सुस्रावे कीर्तनकार तथा विनोदाचार्य हरिभक्त पारायण प्रभाकर महाराज पुयड यांच्या कीर्तन सेवा चे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे श्री नागेश पाटील कल्याण व कल्याण पाटील परिवाराच्या वतीने कार्तिकी एकादशी निमित्त आयोजित जागर हरिनामाचा कीर्तन सेवेचे आयोजन नायगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या विशेष प्रसिद्धी सेवा सहकार्याने करण्यात येते.
पारंपारिक या कीर्तन सेवेसाठी यंदा परिसरातील सुप्रसिद्ध विनोदाचार्य कीर्तनकार ह भ प प्रभाकर महाराज पुयड यांचे सुस्रावे कीर्तनाचे आयोजन दिनांक 23 नोव्हेंबर रोज गुरुवार रात्री ठीक 08:30 वाजता शहरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर नायगाव येथे करण्यात आले आहे. या कीर्तन सोहळ्यास परिसरातील नामवंत व सर्व गुण संपन्न कलाकाराने सात असणार असून यात स्वरसंगम मित्रमंडळाचे अध्यक्ष पत्रकार बाळासाहेब पांडे,बाबुरावजी लंबापुरे, गायनाचार्य श्री बिरादार सर,प्राध्यापक महादेव जी किनाळकर, सर महादेव आप्पा नांदगावकर,नामदेव पांचाळ,स्वरगंगा संगीत संचाचे गणेश हक्के,मृदंगाचार्य विश्वेश्वर जोशी, बालाजी चौधरी, ह भ प त्र्यंबक आप्पा नांदगावकर शि.भ.प. बालाजी भोसकर, विकास जी भुरे,चंद्रकांत अमलापुरे,गायनाचार्य रमेश पाटील जाधव, सुभाष पाटील शिंपाळे, साईनाथ पाटील शिंपाळळे , मारुती नकाते, बासरी वादक विजय द्रोणाचार्य, ज्ञानेश्वर बैस, तबलावादक हरिप्रसाद पांडे, प्राध्यापक वसंत माने सर,दिलीप पाटील चव्हाण, अशोक पाटील चव्हाण, शंकर आप्पा बेळगे,होटाळकर मामा, सदाशिव मदेवाड, वाल्मीक मदेवाड,शिवा महाराज,लक्ष्मण पाटील, आधी सह परिसरातील नामवंत गुणवंत यांची मोठी साथ लाभणार असून या कीर्तन सेवेचा परिसरातील भावी भक्तांना लाभ घेण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक नागेश पाटील कल्याण व कल्याण पाटील परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.

Share This Article
error: Content is protected !!