हिमायतनगर ता.प्रतिनिधी/जरगेवाड बाबाराव
हिमायतनगर : हिमायतनगर तालुक्यातील नामांकित स्वस्त धान्य दुकानदार शंकर आप्पा पळशीकर यांचे रवीवार च्या रात्री 1:40 मिनिटांनी निधन झाले आहे.पळशी येथून येऊन हिमायतनगर सारख्या ठिकाणी शंकर आप्पा पळशीकर यांनी स्वःता शून्यातून विश्व निर्माण केले आहे.ते स्वतःधान्य दुकानदार व सामाजिक कार्यात त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांचे वयाच्या 94 वर्षी निधन झाले, यांच्या पश्चात आप्त परीवार असून त्या मध्ये चार मुले दोन मुली,सुना नातवंड असा परिवार आहे….सुरेश आप्पा पळशीकर शासकीय गुत्तेदार ,रमेश आप्पा पळशीकर कृषी सेवा केंद्र, ,संतोष आप्पा पळशीकर पळशीकर सुपर मार्ट ,संदिप आप्पा पळशीकर,कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक यांचे ते वडील होते.
त्यांची अंत्ययात्रा सोमवार, दिनांक ०३/०७/२०२३ रोजी दुपारी ४ वाजता त्यांच्या निवास स्थानापासून निघणार आहे.