मुदखेड : दनोव्हेंबर मुदखेड तालुक्यातील चिलपिंपरी ग्रामपंचायत येथे सविधान दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी ग्रामविकास अधिकारी व सर्व नागरिकानी भारतीय संविधानाचे एक मुखाने वाचन केले व सर्वांना संविधानाचे महत्त्व सांगितले या वेळी ग्रामविकास अधिकारी शंकर चिलेमुड,माजी सरपंच सुभाष गाढे, सरपंच प्रतिनिधी रत्नपाल कोलते, उप सरपंच दत्तराम गाढे,पत्रकार राहुल कोलते, नारायण गाढे, शिवाजी गाढे, व्यंकटी गाढे आदींची उपस्थिती होती.