नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड :दि.३०.जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत अनेक योजनेची अंमलबजावणी केली जाते. हा विभाग समाजातील दुर्बल घटकाच्या उन्नतीसाठी नेहमी अग्रसेर राहतो.पण मागील अनेक महिन्यापासून या विभागाचा कारभार नियमाला बाजूला ठेवून सुसाट चालू असल्याचे नागरीकातून बोलल्या जात आहे.
या विभागातील शैक्षणिक पदभर्ती ही कायद्याला बाजूला ठेवून लक्ष्मीच्या माध्यमातून सुरू केली जात असून या कारभाराची चौकी करण्यात यावी अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे.नांदेड जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाअंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी दरवर्षी विविध विकास कामासाठी शासनाकडून मंजुर होतो.
दलितवस्तीसााठी हा विभाग नेहमीच चर्चेत राहातो. पण त्यापेक्षाही अधिकचा भ्रष्ट कारभार या विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या अपंग शाळा,मतिमंद शाळा,निवासी वस्तीगृह,निवासी आश्रमृशाळा अशा अनेक प्रकारच्या शैक्षणिक संस्था या विभागामार्फत चालविल्या जातात. आणि यासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपयांचे अनुदान प्राप्त होते. पण मागील दोन वर्षापासून हा विभाग सुसाट सुटला आहे. या विभागाअंतर्गत येणाऱ्या वस्तीगृह, शाळा,या ठिकाणची पदभरती ही शासन मान्यता न घेता किंवा शासनाकडून मान्यता मिळाली असली तरी कोणत्याही प्रकारची जाहीरात बाजी न करता लाखो रुपयांचा उलाढाल करून पदभर्ती केली जात आहे.
शासनाच्या नियमाला समाज कल्याण विभागाने कैराची टोपली दाखवून या विभागातील अधिकारी आणि याच विभागामार्फत चालणाऱ्या नांदड शहरातील एका संस्थेवरील कर्मचारी यांच्या मार्फत लाखो रुपयांच्या कारभाराने पदभर्ती केली जात आहे ही पदभर्ती कोणत्या नियमाने केली जात आहे.याची चौकशी करण्यात यावी व यात दोषी आढणाऱ्या व्यक्तीविरुध्द कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे केली असल्याची माहिती समोर येत आहे.