मराठा योद्धा मनोज पाटील जरांगे यांच्या विराट जाहीर सभेस मोठया संख्येने उपस्थित रहा – प्रा.रवींद्र वसंतराव चव्हाण

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यातील नायगाव,उमरी,धर्माबाद,देगलूर बिलोली,मुखेड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा योद्धा मनोज पाटील जरांगे यांची जाहीर सभा दि.8 डिसेंबर रोजी नायगाव (बा) येथे आयोजित करण्यात आली आहे.

 

त्यानिमित्ताने आज नरसी येथे भगवान बालाजी मंदिरात पूर्वनियोजित बैठक संपन्न झाली.या बैठकीत मी सकल मराठा समाजाचा एक पाईक म्हणून उपस्थित आहे मी अंतरवाली सराटी येथे 15 किलोमीटर पायी प्रवास करून भव्य जाहीर सभेचा साक्षीदार झालो होतो याचा मला अभिमान आहे.

 

मनोज पाटील जरांगे यांच्या बैठकीसाठी पाच कमिट्या तयार करून विविध तालुक्यावर ती कमिटी स्थापन करण्यात यावी प्रसिद्धीसाठी एक कमिटी तयार करावी आर्थिक कमिटीमध्ये प्रत्येक तालुक्यातून एकाचा समावेश करावा सर्व मराठा समाज बांधवांनी या जाहीर सभेला मी एक मराठा समाज म्हणून यावे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे नायगाव शहरांमध्ये आगमन होत आहे.

 

त्यामुळे मी माझ्या परीने एक मराठा बांधव म्हणून जी जबाबदारी आपण माझ्यावर द्याल ती जबाबदारी मी कसलाही राजकीय हेतू मनात न ठेवता पार पाडेल याची मला खात्री आहे.

Share This Article
error: Content is protected !!