मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची ऐतिहासिक सभेची जोरदार तयारी नायगाव नगरीत

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

जिल्हा प्रतिनिधी नांदेड/अशोक वाघमारे 
नांदेड – नायगाव शहरात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची ऐतिहासिक व विराट सभेची जोरदार तयारी सुरू असून ही सभा दिनांक 8 डिसेंबर रोजी ठीक 3 वाजता होणार असून या ऐतिहासिक सभेची जोरदार तयारी उमरी,धर्माबाद, बिलोली, नायगाव,मुखेड, देगलूर, या सहा तालुक्यातून सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने या सभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे. या विराट सभेसाठी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने नायगाव शहरातील बैल बाजार च्या मोठ्या मैदानात सभेचे आयोजन केले असून या सभेसाठी नायगाव धर्माबाद उमरी बिलोली देगलूर मुखेड या भागातून लाखोंच्या संख्येने सकल मराठा समाज बांधव येणार असून या विराट सभेला मनोज जरांगे पाटील ठीक 3:00 वाजता संबोधित करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सकल मराठा समाज बांधवांचे प्रश्न व आरक्षण मिळवण्याकरिता आणि सरकारने वारंवार आरक्षणाकडे मोठे दुर्लक्ष करत असल्याची खंत मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात येत असून या सरकारला वेळेवर जाग आणण्याकरिता आणि मराठा समाजाला लवकर आरक्षण मिळविण्याकरिता नायगाव शहरामध्ये विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सरकारने वारंवार समाजाची दिशाभूल करत असून समाजाला कुठे आश्वासन देऊन समाजाचा गैरवापर करत असल्याची देखील खंत करण्यात आली आहे. यात केंद्र व राज्य सरकारने जाणीवपूर्वक समाजाला खोटे आश्वासन देऊन समाजासाठी वेळ काढू पणा करत असल्याची देखील सांगण्यात येत आहे. म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने नायगाव शहरामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विराट सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून देण्यात आली आहे. सदर सभेसाठी नायगाव धर्माबाद उमरी देगलूर बिलोली मुखेड जिल्ह्यातून सकल मराठा समाज बांधव लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Share This Article
error: Content is protected !!