भोकर शहरात खुलेआम मटका चालू अनेक युवक युवा कामगारांचे जीवन उद्ध्वस्त

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

जिल्हा प्रतिनिधी नांदेड/अशोक वाघमारे 
नांदेड – भोकर शहरात खुल्या मटका चालू असल्याचे दिसून येत आहे याकडे मात्र पोलीस प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याने मटका भादरांचे मनोबल वाढल्याचे कुणालाही न जमता राजेरोष पणे मटका चालवत आहे याकडे हप्ते घेऊन प्रशासन मात्र मटका भादरांना अभय देण्याचे दिसून येत आहे या प्रकारची सखोल चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे या भोकर मतदारसंघाचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अशोक रावजी चव्हाण साहेब या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतील का अशी सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा चालू आहे शाळकरी मुले महाविद्यालयीन मुले हमाल मिस्त्री कामगार रोजी रोटी करून पोट भरणारे त्या सर्व गरीब जनता मटक्यांच्या नादी लागून जीवन उध्वस्त होत असल्याने याकडे प्रशासन किंवा लक्ष देईल आणि या अवैध मटक्याचा मटक्याला आळा कधी बसेल अशी चिंता सर्वसामान्य जनतेमध्ये व्यक्त होताना दिसून येत आहे. भोकर शहरातील व तालुक्यातील अवैध धंदे तत्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी देखील आता नागरिकाकडून होताना मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

Share This Article
error: Content is protected !!