जिल्हा प्रतिनिधी नांदेड/अशोक वाघमारे
नांदेड – किनवट शहराला कायमस्वरूपी पाणी पुरवण्याची सोय व्हावी म्हणून गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या नळ योजनेचे काम कासव गतीने सुरू असून तयार असलेल्या जल कुंभ पर्यंत अद्याप पर्यंत पाणी पोहोचले नाही त्यामुळे ही योजना नावालाच उरली आहे.
शहरातील पक्की सिमेंट काँक्रेटचे रस्ते मधोमध फोडून पाईपलाईन टाकण्याच्या नावाखाली रस्त्याची वाट लावली आहे त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या व शिवाजी नगरात जाणारा रोड रस्ता तूर्तास अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्सव अभियान अंतर्गत किनवट शहराला 19 कोटी 4 लक्ष रुपयांचा निधी वाढीव पाणीपुरवठा नळ योजनेला 2019 ला मंजुरी देण्यात आली दोन वर्षात काम पूर्ण करण्याच्या कालावधी होता पण निर्धारित काळात काम पूर्ण झाले नसल्याने एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली त्याही काळात काम पूर्ण झाले नाही आत्ता परत मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली मुदतवाढ मदत वाढ देऊनही काम पूर्ण होतो होईना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे नागझरी मध्यम प्रकल्पातून किनवट शहराला पाणीपुरवठा देणाऱ्या यांना योजनेच्या कामाची गत दीड वर्षापासून गत खुंटली आहे मात्र शहराच्या गल्लीबोळात पाईपलाईन टाकून रस्ते फोडले आहे. शहरवासीयांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक झहीरुद्दीन खान यांनी दिला आहे बिल्लोरी वार्डातील 50 हजार लिटर रक्षमतेचे सुभाष नगर एक लाख लिटर व साई नगरातील साडेसहा लाख लिटर क्षमतेचे दोन अशा चारही टाक्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत नगरपंचायतचे अभियंता अशोक भालेराव यांना विचारले असता का अंतिम टप्प्यात असून मार्च 2024 चे हेडलाईन असल्याची आता पंप मशीन बसविण्याचे काम बाकी असे त्यांनी सांगितले तरी हे काम त्वरित नाही झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आल्याचे दिसून येत आहे.