जिल्हा प्रतिनिधी नांदेड/अशोक वाघमारे
नांदेड – अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने विविध मागण्या करिता दिनांक 4 डिसेंबर रोजी बेमुदत संपावर जाण्याचा हक्क दिला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे ही वैज्ञानिक पदे असून त्यांना मिळणारा मोबदला हा वेतनच आहे तरी त्यानुसार त्यांना शासकीय कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने येणारी वेतनश्रेणी भविष्य निर्वाह आणि सामाजिक सुरक्षा आणि इत्यादी सर्व लाभ देण्यात यावे वाढती महागाई लक्षात घेऊन अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांना दर महासवीस हजार रुपये व मदतनीस यांना 20000 रुपये दर महा मानधन देण्यात यावे व आदर महा महिन्याच्या मानधनात महागाई निर्देशानुसार वाढ करावी विना योगदान मासिक निर्वाह भत्ता पेन्शन निशेवानिवृत्तीनंतर देण्याचा प्रस्ताव हिवाळी अधिवेशनात मंजूर करून घ्यावा व महानगरपालिका हद्दीत जागेचे निकष स्टील करून अंगणवाडीसाठी पाच हजार ते आठ हजार रुपये भाडे मंजूर करावे आहाराचा दर हा सर्वसाधारण बालकासाठी सोळा व अति कुपोषित बालकासाठी 24 रुपये असा करावा आधी मागणीसाठी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघ तालुका अध्यक्ष सुवर्णमाला कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन तहसीलदार व महिला बाल विकास प्रकल्प विस्तार अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. अर्धापूर येथील अंगणवाडी कृती समितीच्या वतीने आज दिनांक 28 रोजी आपला न्याय मागण्या संदर्भात बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीत चार डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी संगीता वजीर बादे वंदना सूर्यवंशी मीना बोरगे सुरेखा बार्शी सुरेखा तेलंग बबीता तेलमडे स्वाती खंडागळे कलावती कांबळे आठवले ताई अस्मिता लोणे यांच्यासह अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी सेविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.