जिल्हा प्रतिनिधी नांदेड/अशोक वाघमारे
नांदेड – नायगाव पोलिसांच्या आशीर्वादाने गडगा येथे गेल्या एक वर्षापासून तीन ते चार ठिकाणी अवैध मटक्याचे अड्डे सुरू होते दिवाळी पूर्वी बिलोली चे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील व एलसीबीच्या पथकाने तेथील दोन ठिकाणी धाड टाकून कारवाई केली परंतु सोमवारपासून पुन्हा जोरात जोरदार मटक्याचा शुभारंभ झाल्याचे पुन्हा येथे मटका शौकीय यांची गर्दी दिसून येत असून या अवैध धंद्यामुळे अनेकजणांचे संसार उध्वस्त होत आहे वरिष्ठ आणि लक्ष देऊन तात्काळ अवैध चालवणारा मटका जुगार बंद करण्यात यावी अशी मागणी गावातील सुज्ञ नागरिकाकडून होताना दिसून येत आहे
नायगाव पोलिसांच्या आशीर्वादाने गडगा येथे गेल्या वर्षाभरापासून कार्ला येथील एक व नायगाव येथील एक व अन्य दोन असे चार ठिकाणी कल्याण टाइम्स बाजार मिलन डे मिलन नाईट मेन बाजार कल्याण नाईट आधी मटका घेत आहेत येथे दररोज आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील शेकडो शौकीन मटका खेळण्यासाठी येत असल्याने गडग्यात नेहमीच गर्दी दिसून येत आहे गडगा येथे मटका सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी बिलोली येथील डि वाय एस पी व एलसीबी नांदेड येथील पथकाने एकाच वेळी येथील दोन ठिकाणी धाड टाकून पथकाने सहा तर एक पथकाने एकाला पकडून नायगाव ठाण्यात गुन्हा दाखल केले होते या कारवाईने येथील मटका आता बंद होईल असे वाटत असताना कारला येथील एक व नायगाव येथील एक या दोघांनी पुन्हा आपले मटक्याचे दुकान सुरू केले आहे या मटक्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन येथील मटका कायमचा बंद करण्यात यावा अशी मागणी होत आहे विशेष म्हणजे नायगाव पोलिसांच्या नाकावर ठेचून येतील बाहेरील पथकणे कारवाई केली तरी पुन्हा मटका चालू असल्याने नायगाव पोलिसांच्या कारवाई पद्धतीवर आचार्य व्यक्त करण्यात येत आहे.