छत्तीसगढमध्ये मोठ्या फरकाने भाजपाची बहुमताकडे वाटचाल

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

रायपूर : छत्तीसगढ विधानसभा निवडणूकीच्या निकालामध्ये सुरुवातीला मिळालेली आघाडी काँग्रेस पक्षाला टिकवता आलेली नाही. भाजपने सुरुवातीच्या पिछाडीनंतर ९० जागा असलेल्या छत्तीसगढमध्ये ५२ जागांवर आघाडी मिळवली आहे.

तर काँग्रेस ३७ जागांवर आघाडी मिळून दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

 

त्यासोबतच छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे त्यांच्या मतदारसंघात पिछाडीवर आहेत. चार राज्यांच्या या निवडणूकीत काँग्रेस फक्त तेलंगणामध्ये विजय मिळवेल, असा अंदाज आहे. छत्तीसगढ मध्ये २०१८ निवडणुकीत काँगेसने १५ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या डॉ. रमनसिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा पराभव केला होता.

 

२०१८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ६८ जागा मिळाल्या होत्या तर भाजपला अवघ्या १५ जागांवर समाधान मानावे लागले होते. पण २०२३ च्या विधानसभा निवडणूक निकालाच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार भाजप छत्तीसगढमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवत आहे.

Share This Article
error: Content is protected !!