नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड .सामाजिक परिवर्तनाची बांधिलकी म्हणून गुरुद्वारा सचखंड बोर्डातर्फे दरवर्षी सामुहिक विवाह मेळावे (मे व डिसेंबर) महिण्यांत आयोजित करण्यात येतात. आता पर्यंत एकुण 66 विवाह मेळावे संपन्न झाले आहेत.
यामध्ये जवळ-जवळ 2200 हुन अधिक जोपड्यांचे) विवाह गुरुद्वारा बोर्डातर्फे करण्यात आले आहेत. यावर्षीही 2-3 डिसेंबर 2023 रोजी सकाळी ठीक 11:30 वाजता श्री गुरु ग्रंथ साहिब जी भवन येथे माननिय पंजप्यारे साहिबान व इतर प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितित संपन्न झाला. यामध्ये देशातल्या विविध भागातुन सामुहिक विवाह मेळाव्यात विवाह बध्द होण्यासाठी 14 जोडपी सामिल झाली.
यावेळी शैक्षणिक,क्रिडा क्षेत्रात प्राविण्य प्राप्त विद्यार्थि आणि प्रतिष्ठीत नागरिक यांचा विशेष सत्कार करण्यात आले. तसेच डॉ.सौ. राजिंदर कौर हरजीत सिंघ हैद्राबाद यांच्या वतीने प्रकाशित “श्री गुरु ग्रंथ साहिब जी में अभिव्यक्त मानवता” या धार्मिक पुस्तकाचे विमोचन मा.पंजप्यारे साहिबान यांच्या हस्ते व गणमान्य व्यक्तिच्या उपस्थितीत संपन्न झाला.
66 व्या सामुहिक विवाह मेळाव्यात संत बाबा बलविंदर सिंघ जी कारसेवा वाले (गुरुद्वारा लंगर साहिब),संत बाबा तेजा सिंघ जी (मुखी गुरुद्वारा माता साहिब),आजी माजी सदस्य, नांदेड दक्षिणचे विध्यमान आमदार – मोहन अण्णा हंबर्डे,भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे व नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रतिष्ठीत नागरिक तसेच हैद्राबाद, करीमनगर,बीदर,औरंगाबाद, जालना,परभणी,खामगांव, मुर्तिजापुर,धानोरा (शीख) अशा अनेक ठिकाणची वन्हाड मंडळी शुभाशिर्वाद देण्यासाठी उपस्थित होती.यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक ठाण सिंघ बुंगई, एस.ए.एस. शरण सिंघ सोडी, ओ.एस.डी.
नारायणसिंघ नंबरदार यांच्या मार्गदर्शनाखाली व स.हरजीत सिंघ कडेवाले,स.रविन्दर सिंघ कपुर,स.ठाकुर सिंघ बुंगई, स. बलविन्दर सिंघ फौजी सर्व सहाय्यक अधिक्षक,स.बलबीर सिंघ गिल -मेळावा इंचार्ज,स. विक्रमजीत सिंघ कलमवाले, स. जसबीर सिंघ शाहू लंगर इंचार्ज, स.हरपाल सिंघ शिलेदार – सि.एस.ओ.स.प्रदीप सिंघ मान इंचार्ज,स.दिलबाग सिंघ बिल्डींग सुपरवाईजर,स. रविन्दर सिंघ हजूरीया व गुरुद्वारा बोर्डाचे सर्व कर्मचारी,सचखंड पब्लीक स्कुल,हजूर साहिब आय.टी.आय.खालसा हायस्कुल (हिन्दी व मराठी मिडीयम) या संपूर्ण स्टाफ ने आपली सेवा दिली व गुरुद्वारा लंगर साहिबचे 100 सेवादारांनी विशेष सेवा प्रदान केली.
डॉ.विजय सतबीर सिंघ प्रशासक गुरुद्वारा सचखंड बोर्ड यांच्या वतीने नवदम्पतीस भावी जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या अशी माहिती अधीक्षक गुरुद्वारा सचखंड बोर्ड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.