आ.बालाजी कल्याणकर यांच्या माध्यमातून रुग्णांना ६ लाख ७५ हजार रुपयांची मदत

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – गरजू आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या रुग्णांना नांदेड उत्तर चे लोकप्रिय आमदार बा लाजी कल्याणकर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून ६ रूग्णांना ६ लाख ७५ हजार रुपये आर्थिक मदत उपलब्ध करून देऊन मुलांना एक प्रकारे जीवदानंदच दिल्याचे बोलल्या जात आहे.

नांदेड उत्तर मतदारसंघातील ६ रुग्णांना तब्बल ६ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यात आली. राज्याचे संवेदनशील व लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,हिंगोली लोकसभा मतदार संघाचे विकास महर्षी खा.हेमंत पाटील नांदेड उत्तरचे लोकप्रिय व कर्तव्यनिष्ठ आ.बालाजी कल्याणकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाने नांदेड जिल्ह्याचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख गजेंद्रगिर गिरी यांच्या विशेष प्रयत्नाने शहरातील विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ६ रुग्णांना धीर देत रुग्णांच्या नातेवाईकांनी गजेंद्र गिरी यांना संपर्क साधून भेटले असता रुग्णांच्या आर्थिक परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन मुख्यमंत्री सहायता निधी निधीसाठी गिरी यांनी स्वतः अर्ज करून आ.बालाजी कल्याणकर यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून आर्थिक मदत मंजूर करुन दिल्याने रुग्णांच्या नातेवाईकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले…..

अमान फिरोज शेख याच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट रोगावर २ लक्ष रुपये,सुमन सेवालाल डागा यांच्या मेंदू रोगावर २ लाख रुपये,शिवाजी गणपतराव चव्हाण यांच्या आरटीए रोगावर १ लाख रुपये,सुमन बालाजी रणवीरकर यांच्या कर्करोग शस्त्रक्रियासाठी ७५ हजार रुपये, संभाजी रामजी नवरे यांच्या मेंदू रोगावर ५० हजार रुपये,बाबू बशीर शेख यांच्या कर्करोग या आजारावर उपचार करण्यासाठी ५० हजार रुपये अशाप्रकारे तब्बल ६ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यात आली.रुग्णांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खा.हेमंत पाटील, आ.बालाजी कल्याणकर,मंगेश चिवटे,गजेंद्रगिर गिरी यांचे आभार मानले.

Share This Article
error: Content is protected !!