श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी जरांगे पाटील यांचे आज माहूरगडावर आगमन

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

माहूर तालुका प्रतिनिधी/ विजयसिंह हजारी

माहूर: मराठा आरक्षणासाठी आंदोलन करीत असलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आज बुधवार दि.६ डिसेंबर रोजी माहूर शक्तीपिठावर रेणुकादेवीच्या दर्शनासाठी येत असल्याने माहूर-किनवट तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

   आज बुधवारी दुपारी १२ वा. मनोज जरांगे पाटील यांचे राष्ट्रीय महामार्गलगतच्या बळीराजा चौक लांजी बायपास रोड केरोळीफाटा येथे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.तेथून ते रेणुकागडावर दर्शनासाठी जाणारआहेत.रेणुकामातेचे दर्शनानंतर माहूर शहरातील श्री स्वामी समर्थ अन्नछत्रालगत असलेल्या मैदानात उपस्थित समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत.त्यानंतर ते यवतमाळ जिल्ह्यातील महागावकडे प्रस्थान करणार आहेत.या दौऱ्यानिमित्ताने माहूर,किनवट सकल मराठा समाजाच्या वतीने विविध समित्या गठीत करून त्यांना प्रत्येक बाबीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. होणाऱ्या गर्दीच्या नियोजना करिता सकल मराठा समाजाचे १०० स्वयंसेवक तैनात ठेऊन प्रशासनास सहकार्य करणार असल्याचे माहूर-किनवट तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!